Eco friendly bappa Competition
घर गणेशोत्सव 2022 गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७,७६४ गणेशमूर्तींची वाढ; कृत्रिम तलावांत १२ हजाराने घट

गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७,७६४ गणेशमूर्तींची वाढ; कृत्रिम तलावांत १२ हजाराने घट

Subscribe

मुंबईत गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव इतर सण , उत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र यंदा कोरोना नियंत्रणात आला व राज्य सरकारने निर्बंध हटवले. त्यामुळे मुक्त वातवरणात मुंबईकरांनी धुमधडाक्यात, जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला.

मुंबई : मुंबईत गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव इतर सण , उत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र यंदा कोरोना नियंत्रणात आला व राज्य सरकारने निर्बंध हटवले. त्यामुळे मुक्त वातवरणात मुंबईकरांनी धुमधडाक्यात, जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, यंदा विसर्जित गणेशमूर्तींच्या संख्येत तब्बल २७,७६४ ने वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र यंदा कृत्रिम तलावांच्या संख्येत कदाचित घट झाल्यामुळे विसर्जित गणेशमूर्तींच्या संख्येत १२,०३८ ने घट झाल्याचे दिसून आले. (increase of 27764 Ganesha idols this year compared to last year Reduction by 12 thousand in artificial ponds)

मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून केवळ हिंदूच नव्हे तर सर्वधर्मीय बांधव मिळून गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. मात्र गेल्या मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यामुळे गेले दोन वर्षे राज्य सरकार व महापालिका प्रशासन यांनी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सण, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध घातले होते. त्यामुळे मुंबईकरांनी कोरोना नियमांचे पालन करून गेले दोन वर्षे सण व उत्सव कसेबसे साजरे केले. मात्र मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने गेल्या दोन वर्षांत जी काही मेहनत व कष्ट घेतले त्यामुळे कोरोना नियंत्रणात आला. त्यातच राज्यात राजकीय भूकंप होऊन सत्तांतर झाले.

- Advertisement -

नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दहीहंडी उत्सवापासून गणेशोत्सव व यापुढील सर्वच सण उत्सव कोरोनाला न घाबरत मुक्त वातवरणात साजरे करण्याचा निर्णय घेतला. परिणामी मुंबईत यंदा दहीहंडीप्रमाणेच गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात , उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. ३१ ऑगस्ट रोजी मुंबईकरांनी गणेश चतुर्थीला श्रीगणेशाचे आगमन होताच मनोभावे व धुमधडाक्यात स्वागत केले. तसेच, दीड, पाच, सहा, सात व दहा दिवसांच्या गणरायाचे मोठया जल्लोषात, उत्साहात, आनंदात मिरवणुका काढून विसर्जन केले.

यंदा व गतवर्षीच्या गणेश विसर्जनाची तुलनात्मक माहिती

- Advertisement -

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मुंबईतील ७३ नैसर्गिक व १६२ कृत्रिम तलाव या विसर्जन स्थळी १ ते १० सप्टेंबर या कालावधीत १,८६,२६७ गणेशमूर्तींचे विसर्जन केले. यामध्ये, ९,९६७ सार्वजनिक व १,७६,३०० घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे. तर यंदा ६,७९५ गौरी/ हरतालिका यांचे विसर्जन करण्यात आले. एकूण विसर्जित गणेशमूर्तीमध्ये, कृत्रिम तलावांत विसर्जित ६३,८०७ मूर्तींचा समावेश आहे. त्यामध्ये, १,८२२ सार्वजनिक तर ६१,९८५ घरगुती मूर्तींचा समावेश आहे. तसेच, त्यात २,३२० गौरी/ हरतालिका यांचा समावेश आहे.

यंदाच्या तुलनेत गतवर्षी, मुंबईतील ७३ नैसर्गिक व १७३ कृत्रिम तलाव या विसर्जन स्थळी ११ ते १९ सप्टेंबर या कालावधीत १,५८,५०३ गणेशमूर्तींचे विसर्जन केले. यामध्ये,८,०४९ सार्वजनिक व १,५०,४५४ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे. तर ६,५३७ गौरी/ हरतालिका यांचे विसर्जन करण्यात आले होते. त्यावेळी एकूण विसर्जित गणेशमूर्तीमध्ये, कृत्रिम तलावांत विसर्जित ७५,८४७ गणेशमूर्तींचा समावेश आहे. त्यामध्ये, ३,४९८ सार्वजनिक तर ७२,३४७ घरगुती मूर्तींचा समावेश आहे. तसेच, त्यात ६,२१२ गौरी/ हरतालिका यांचा समावेश आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७,७६४ गणेशमूर्तींची वाढ

या तुलनात्मक माहितीवरून गतवर्षीच्या तुलनेत यंदा गणेशमूर्तींच्या संख्येत २७,७६४ ने वाढ झाली आहे. त्यात, १,९१८ सार्वजनिक तर २५,८४६ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे. तसेच, गतवर्षीच्या तुलनेत यंदा गौरी/ हरतालिकांच्या संख्येतही २५८ ने वाढ झाली आहे.

कृत्रिम तलावांत १२ हजाराने घट

कृत्रिम तलावातील विसर्जित गणेशमूर्तींच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत यंदा १२,०३८ ने घट झाली आहे. यात, १,६७६ सार्वजनिक व १०,३६२ घरगुती मूर्तींचा समावेश आहे. तसेच, कृत्रिम तलावात गतवर्षीच्या तुलनेत यंदा गौरी/ हरतालिकांच्या संख्येतही ३,८९६ ने घट झाली आहे.

  • यंदा विसर्जित मूर्तींची संख्या १,८६,२६७
  • गतवर्षीच्या मूर्तींची संख्या १,५८,५०३
  • एकूण २७,७६४ मूर्तींची वाढ
  • कृत्रिम तलावांत गतवर्षी ७५,८४५ मूर्तीचे विसर्जन
  • यंदा ६३,८०७ मूर्तींचे विसर्जन
  • १२,०३८ मूर्तींची घट

हेही वाचा – शनिवारी राज्यात 734 नवे रुग्ण; 1216 रुग्ण कोरोनामुक्त

- Advertisment -