घरताज्या घडामोडीएसटी महामंडळाला आर्थिक दिलासा; उत्पन्नात 12 कोटी रुपयांची वाढ

एसटी महामंडळाला आर्थिक दिलासा; उत्पन्नात 12 कोटी रुपयांची वाढ

Subscribe

गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने एसटी महामंडळ तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला आर्थिक दिलासा मिळाला आहे. एसटी महामंडळाचे मंगळवारी उत्पन्न दिवसाला 25 कोटी 47 लाखांवर पोहोचले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला आर्थिक दिलासा मिळाला आहे. एसटी महामंडळाचे मंगळवारी उत्पन्न दिवसाला 25 कोटी 47 लाखांवर पोहोचले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या दिवसाच्या सरासरीच्या उत्पन्नात 12 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे समजते. (increase of rs 12 crore income of msrtc st bus)

यंदा दिवाळीनिमित्त एसटीच्या तिकीट दरात 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. या भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न 8 कोटींनी वाढले. एसटी महामंडळाचे सरासरी दर दिवसाला उत्पन्न 15 कोटींच्या जवळपास आहे

- Advertisement -

एसटी महामंडळाला कोरोना काळात मागील दोन वर्ष अतिशय खडतर गेले आहेत. कोविड काळामध्ये एसटी महामंडळाच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. त्यानंतर अनेक महिने सुरू असलेला एसटीचा संप. याचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला होता. या सर्व गदारोळात एसटी महामंडळाच्या सेवेवर परिणाम झाला होता. एकंदरीत सर्वच ठप्प झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या उत्पन्नात झालेल्या वाढीनंतर एसटी महामंडळाचा 10 वर्षांतला आर्थिक उच्चांकी आकडाही वाढत आहे. दरम्यान, एसटीच्या ताफ्यात असलेल्या 13 हजार गाड्यांमधून येणारे सर्वाधिक उत्पन्न पाहायला मिळत आहे. शिवाय, एसटीच्या संपानंतर पुन्हा एकदा प्रवासी एसटीकडे परतत आहेत. 30 ऑक्टोबर रोजी दिवसाला 23 कोटींपर्यंतचे उत्पन्न जमा झाले होते.

- Advertisement -

दरम्यान, एसची महामंडळाने 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत तिकीट दरात भाडेवाढ केली होती. त्यानंतपर 1 नोव्हेंबरपासून पुन्हा तिकीट दर पूर्वपदावर आले आहेत. तसेच, प्रवासीही एसटीकडे पुन्हा परतत आहेत. त्यामुळे उत्पन्नात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

दिवाळी मध्ये सर्वाधिक उत्पन्न 31 आक्टोबर रोजी 25 कोटी 48 लाख इतके आले आहे. तर दिवाळीपूर्वी एसटीचे दैनंदिन उत्पन्न सरासरी 13 कोटीच्या आसपास होते. ते दिवाळीमध्ये तब्बल 20 कोटी पर्यंत गेले आहे.


हेही वाचा – खासदार संजय राऊत यांची होणार का मुक्तता? जामीन अर्जावर आज सुनावणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -