घरमहाराष्ट्रनाशिकटाकेदमध्ये वाढला धोका; पती-पत्नी कोरोनाबाधित

टाकेदमध्ये वाढला धोका; पती-पत्नी कोरोनाबाधित

Subscribe

गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

टाकेद  : इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून तालुक्यातील टाकेद बु. या गावात आज ६० व ५५ वर्षीय पती-पत्नी कोरोना पोझिटिव्ह आढळून आले आहे. टाकेद गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिवसेंदिवस या जीवघेण्या आजाराने रुग्णसंख्या वाढतच आहे. या आजाराने मोठ-मोठ्या महानगर क्षेत्रात शिरकाव केला आहे. आता ग्रामीण भागातही आपले बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत इगतपुरी तालुका हा या आजाराने अपवाद ठरला होता. परंतु, या आजाराने आता इगतपुरी तालुक्यामध्येही शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. आज तालुक्यातील टाकेद बु. या गावात पती-पत्नीलाही कोरोनाची लागण झालेली आहे. पेशंट हा   पेशाने डॉक्टर असून त्यांच्या पत्नीलाही लागण झालेली आहे. सध्या दोन्हीही रुग्ण नाशिक येथे उपचार सुरू आहे. तरीही टाकेद गाव सम्पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. टाकेद गावात रुग्ण आढल्याचे कळताच आरोग्य विभाग मेडिकल ऑफिसर पी. आर. गुप्ता, आरोग्यसेवक आर. बी. जाधव, आरोग्यसेविका एन. बी. सोनवणे, संपूर्ण आशासेविकांची टीम यांनी रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण ३० ते ३५ लोकांचे चेकअप करून त्यांना क्वारंटाईन केले आहे. तसेच यावेळी टाकेद ग्रामपंचायतीतर्फे संपूर्ण गावातून जंतुनाशकाची तातडीने फवारणी करण्यात आली आहे. तसेच तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -