घरCORONA UPDATEकोरोना व्हायरस : लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ!

कोरोना व्हायरस : लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ!

Subscribe

कोरोनामुळे नागरिकांना घरामध्ये राहून ताण वाढत आहे. त्यामुळे पती व पत्नीमध्ये किरकोळ गोष्टीवरून भांडणं-तंटे होण्याचे प्रमाण वाढत आहे.

कोरोनामुळे नागरिकांना घरामध्ये राहून ताण वाढत आहे. त्यामुळे पती व पत्नीमध्ये किरकोळ गोष्टीवरून भांडणं-तंटे होण्याचे प्रमाण वाढत आहे. राजस्थानमधील सिकारमध्ये राहणाऱ्या आपल्या मुलीला तिचा नवरा अमानुषपणे मारहाण करत आहे, अशी तक्रार तिच्या वडिलांनी केली आहे. कुणी नवऱ्याच्या रागाचे लक्ष्य होत आहे, तर कुणाला जेवायची भ्रांत आहे. अशी काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. पण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्याचा सगळ्यात विपरीत परिणाम हा घरातील नातेसंबंधावर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. २४ तास घरात राहावे लागत असल्याचे नैराश्य आणि राग घरातील पुरुष पत्नीवर काढत आहे. त्यातून घरगुती छळाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

२४ मार्चपासून देशभरातील नागरिक घरातच अडकून पडले आहेत. याच काळात राष्ट्रीय महिला आयोगाकडे आलेल्या घरगुती छळाच्या तक्रारींचा आकडा चिंता करायला लावणारा आहे. २३ मार्च ते ३० मार्च या कालावधीत फक्त इमेलद्वारे आलेल्या या तक्रारीचा आकडा ५८ आहे. या बहुतांश तक्रारी पंजाब आणि उत्तर भारतातून आल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी सांगितले.

- Advertisement -

घरातच राहावे लागत असल्यामुळे पुरुषामध्ये नैराश्य वाढत आहे. त्यामुळे हा राग घरातील महिलांवर काढत आहे, असे निरीक्षण शर्मा यांनी नोंदविले. ५८ आकडा हा इमेलद्वारे आलेल्या तक्रारींचा आहे. मात्र, प्रत्यक्ष घटना अधिकच असण्याची शक्यता आहे. ईमेल न पाठवू शकणाऱ्या महिला या पोस्टाद्वारे तक्रारी पाठवत असतात. त्याचे प्रमाण ही अधिक असते, असे त्या म्हणाल्या. राज्य महिला आयोगाकडे अशाच स्वरूपाच्या तक्रारी येत असल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांनी कोणत्याही प्रकारचा छळ सहन न करता, राज्य आयोग किंवा पोलिसांकडे मदत मागावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मार्चमध्ये महिला आयोगाकडे आलेल्या एकूण तक्रारी २९१

- Advertisement -

(२३ मार्च पासून केवळ इमेलवर तक्रारी येत आहेत.)

फेब्रुवारी – ३०२

जानेवारी – २७०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -