घरताज्या घडामोडीकोरोना संकटातही अखंडित सेवा देणाऱ्या बेस्टचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक

कोरोना संकटातही अखंडित सेवा देणाऱ्या बेस्टचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक

Subscribe

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात घरोघरी तिरंगा फडकवून मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबत बेस्ट उपक्रमानेही महापालिकाकरणाचा अमृत महोत्सव कुलाबा, बेस्ट भवन येथील मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी उत्साहात साजरा केला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात घरोघरी तिरंगा फडकवून मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबत बेस्ट उपक्रमानेही महापालिकाकरणाचा अमृत महोत्सव कुलाबा, बेस्ट भवन येथील मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी उत्साहात साजरा केला. यावेळी, मार्गदर्शन करताना बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी, आजपर्यंत अतिशय माफक दरात दर्जेदार बससेवा आणि वीजपुरवठा सेवा अखंडपणे देणाऱ्या बेस्टने कोरोना टाळेबंदी काळात देखील आपल्या कार्यक्षम सेवेची परंपरा कायम राखली. त्यामुळेच बेस्ट उपक्रमाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक आहे, या शब्दात कौतुक केले. (Independence Day 2022 celebration in best bhawan mumbai)

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8:15 वाजता बेस्ट उपक्रमाचे प्रशासक तथा महाव्यवस्थापक माननीय लोकेश चंद्र यांच्या शुभहस्ते कुलाबा, बेस्ट भवन येथील बेस्टच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज तिरंगा डौलात फडकविण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला.

- Advertisement -

देशातील सर्व शासकीय इमारती, मंत्रालय, विधान भवन, खासगी कंपन्या, कार्यालये, वसाहती, झोपडपट्टीतही अगदी घरोघरी देशाची शान असलेला तिरंगा फडकविण्यात आला. देशाच्या इतिहासात स्वातंत्र्य प्राप्तीपासून प्रथमच घरोघरी तिरंगा फडकविण्यात आल्याने एक अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबत बेस्ट उपक्रमानेही महापालिकाकरणाचा अमृत महोत्सव कुलाबा, बेस्ट भवन येथील मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी उत्साहात साजरा केला.

1873 साली स्थापन झालेल्या बेस्ट कंपनीने सुरवातीला सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून कुलाबा ते पायधुणीपर्यंत घोड्यांनी ओढली जाणारी ट्राम मुंबईकरांच्या सेवेत आणली. 7 ऑगस्ट 1947 साली बेस्ट उपक्रमाचे महापालिकाकरण झाले. आज बेस्ट परिवहन विभागाने 2022 पर्यन्त उतुंग व ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रारंभी घोड्यांच्या साहाय्याने ओढली जाणारी ट्रामसेवा देणारी बेस्टने हळूहळू विजेवरील ट्राम, एक मजली बस, दुमजली बस, पेट्रोल, डिझेल, सीएनजीवरील बससेवा देतदेत आज इलेक्ट्रिक व एसी बस सेवा तोटा सहन करीत अगदी माफक दरात बस सेवा देण्याची परंपरा सुरू ठेवली आहे.

- Advertisement -

याप्रसंगी, महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी, आजपर्यंत माफक दरात दर्जेदार बससेवा आणि वीजपुरवठा देण्यात बेस्टने आपला नावलौकिक राखल्याचे सांगितले. तसेच, कोरोना सारख्या महामारीत, अगदी टाळेबंदीच्या काळात देखील बेस्टने आपल्या कार्यक्षम सेवेची परंपरा कायम राखली. त्याचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतूक झाल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगत बेस्टच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

आज संपूर्ण भारतात सर्वाधिक इलेक्ट्रिक बसगाड्या फक्त बेस्टकडेच आहेत. आज बेस्ट उपक्रमाकडे इलेक्ट्रिक, एसी, दुमजली बससह एकूण 3680 बसगाड्या असून भविष्यात एकूण 10,000 बसगाड्यांचे लक्ष्य ठेवणाऱ्या बेस्टच्या सर्व बसगाड्या इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या असतील, असे प्रशासनाने ठरवले आहे. दुसरीकडे विनाखंडित वीजपुरवठा करणारी बेस्ट ही राष्ट्रीय स्तरावर नावाजलेली संस्था आहे. यापुढेदेखील बेस्ट उपक्रम अशीच सेवा मुंबईकरांना देत राहील, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


हेही वाचा – जनतेच्या हितासाठी नावीन्यपूर्ण आणि चांगले उपक्रम राबविण्याचा प्रयत्न : एकनाथ शिंदे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -