घरताज्या घडामोडीहर घर तिरंगा'मुळे सर्वसामान्यांच्या घरी तिरंगा फडकला : मंत्री चंद्रकांत पाटील

हर घर तिरंगा’मुळे सर्वसामान्यांच्या घरी तिरंगा फडकला : मंत्री चंद्रकांत पाटील

Subscribe

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात ध्वजारोहण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. पंतप्रधान मोदींशिवाय अनेक राजकीय नेत्यांनी ध्वजारोहण केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये ध्वजारोहण केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात ध्वजारोहण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. पंतप्रधान मोदींशिवाय अनेक राजकीय नेत्यांनी ध्वजारोहण केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये ध्वजारोहण केले. तसेच, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी “पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘हर घर तिरंगा’मुळे सर्वसामान्यांच्या घरी तिरंगा फडकला”, असे म्हटले. (Independence Day 2022 Minister of Higher and Technical Education chandrakant patil kolhapur)

“पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर स्वातंत्र्याचा अर्थ सर्वांना कळावा, यासाठी त्यांनी सबका साथ सबका विकासचा नारा दिला, यामधील एक घरोघरी तिरंगा होता. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरी तिरंगा फडकला. मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील”, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

- Advertisement -

“हर घर तिरंगा मोहीमेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 28 लाख घरांमध्ये तिरंगा पोहोचला. मार्केटमध्ये तर अशी परिस्थिती होती की तिरंगा मिळत नव्हता. अनेक ठिकाणी पोलिसांना मध्यस्ती करावी लागली. काही ठिकाणी प्रभात फेरी निघाली असून अनेक ठिकाणी रॅली निघाल्या. ‘हर घर तिरंगा’ मोहीमेमुळे देशाबद्दल प्रेम आणि जागरूकता निर्माण झाली आहे”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

याप्रसंगी पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नव्हते. हा देश समृद्ध होता. मात्र, इ.स. 1200 ते 1700 या कालावधीमध्ये या देशाला दृष्ट लागली. या कालावधीत मुघलांचे आक्रमण झाले. त्यानंतर पोर्तुगीज, इंग्रज, डच आले, आणि त्यानंतर 150 वर्षाचा इंग्रजांचा कालावधी होता. हा कालखंड संपण्यासाठी पंडित जवाहलाल नेहरू, महात्मा गांधीजी, सुभाष चंद्र बोस, सरदार वल्लभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिकारक सुखदेव, राजगुरू, सुभाष बाबू या प्रत्येकाने आपल्यापर्यंत प्रयत्नांनी कोणी शांततेच्या मार्गा तर, कोणी क्रांतिकारी मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. अखेरीस 15 ऑगस्ट 1947 साली देश स्वतंत्र झाला”

- Advertisement -

“हे मिळालेले स्वातंत्र्य टिकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. त्यांनी कायद्याची रचना केली, ती घटना पुढील हजारो वर्षे बदलावी लागणार नाही. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर या देशामध्ये सुई सुद्धा निर्माण होत नव्हती. मात्र, आता काही वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर आपण लष्करी सामग्री सुद्धा आपण निर्यात करत आहोत”, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्ष शैलेश बलकवडे, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, श्रीमंत शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.


हेही वाचा – स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींसह राजकीय नेत्यांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -