घरमहाराष्ट्रनागपूर'या' अपक्ष आमदाराने शिंदे सरकारची Y+ सुरक्षा नाकारली, म्हणाले...

‘या’ अपक्ष आमदाराने शिंदे सरकारची Y+ सुरक्षा नाकारली, म्हणाले…

Subscribe

बंडखोर आमदारांना जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या रोषाला सामोर जावे लागू शकते यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने बंडखोरांना सुरक्षा पुरवली होती. पण एका बंडखोर अपक्ष आमदारांनी शिंदे सरकारची Y+ सुरक्षा नाकारली आहे.

बंडखोर आमदारांना जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या रोषाला सामोर जावे लागू शकते यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने बंडखोरांना सुरक्षा पुरवली होती. पण चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शिंदे सरकारने पुरवलेली Y+ सुरक्षा व्यवस्था नाकारली आहे. आम्ही जनतेतून निवडून आलेले आमदार आहोत. जनतेचे जिथे कल्याण आहे तोच निर्णय मी घेतलेला आहे. जनता खूश आहे. त्यामुळे सरकारने दिलेली सुरक्षा मी नाकारली, असे किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले.

किशोर जोरगेवार यांनी सुरक्षा व्यवस्था नको असल्याचे सविस्तर पत्र लिहिले आहे. काल त्यांना चंद्रपूर एसपी ऑफिसमधून फोन आला. आपल्याला सरकारकडून Y+ सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय झाला आहे. आपल्यासोबत 6 पोलीस कॉन्स्टेबल असतील, असे पोलिसांनी किशोर जोगेवार यांना सांगितले. पण त्यांनी त्याक्षणी Y+ सुरक्षा व्यवस्था नको असल्याचे सांगितले.

- Advertisement -

Y+ सुरक्षा व्यवस्था काय असते याची मी माहिती घेतली. आपण महाराष्ट्रात जिथे जाल तिथे आपल्यासोबत एक शासकीय गाडी आणि एक पोलिसांची गाडी ज्यामध्ये 6 पोलिस हवालदार असतील, असे पोलीस अधिक्षकांनी मला सांगितले. मात्र, तेव्हाच मी मेल करून मी ही सुरक्षा व्यवस्था नको असल्याचे पोलिसांना कळवले, असे जोरगेवार यांनी सांगितले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -