घरमहाराष्ट्रराज्यपालांवर अपक्ष आमदाराची बोचरी टीका, म्हणाले...

राज्यपालांवर अपक्ष आमदाराची बोचरी टीका, म्हणाले…

Subscribe

अध्यक्षपदाची विवडणूक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या काही दिवसांमधील निर्णयामुळे शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणि भाजप असा संघर्ष सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारानी राज्यपालांवर टीका केली.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे अॅड. राहुल नार्वेकर यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाल्याने आज होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाची फक्त औपचारिकता शिल्लक राहिल्याचे चित्र दिसत आहे. अध्यक्षपदाची विवडणूक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या काही दिवसांमधील निर्णयामुळे शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणि भाजप असा संघर्ष सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन करणारे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना भुयार यांनी स्पष्ट शब्दात भगतसिंह कोश्यारींविरोधात नाराजी व्यक्त केली. यावेळी कोश्यारी म्हणजे स्वातंत्र्यापासून महाराष्ट्राला मिळालेले सर्वात बोगस राज्यपाल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.हे राज्यपाल फार विचित्र माणूस आहेत.हे राज्यपाल कुठून आले, कसे आले, कोणी आणले त्यांचं त्यांनाच माहिती, असा टोला भुयार यांनी लगावला. पुढे जेवढे राज्यपाल महाराष्ट्राला स्वातंत्र्यापासून लाभले आहेत त्यातला एक नंबरचा बोगस राज्यपाल म्हणजे हा राज्यपाल आहे. त्याच्यामुळे याच्यावर न बोलेले बरे, अशा शब्दात कोश्यारींवर त्यांनी टीका केली.

- Advertisement -

शरद पवारांची टीका –

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथविधी सोहळ्यादरम्यान पेढा खायला घालतानाचा राज्यपालांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यपाल कोश्यारींना टोला लगावला आहे. मी अनेक शपथविधी सोहळ्यात सहभागी झालो. मात्र, मला आजपर्यंत कोणत्याही राज्यपालांनी पेढा भरवला नाही किंवा पुष्पगुच्छ दिले नाहीत, असे म्हणत पवारांनी राज्यपालांवर टीका केली.

- Advertisement -

2019 मध्ये महाविकास आघाडीचे नेते शपथ घेत होते तेव्हा, मी तिथे उपस्थित होतो. आमच्या एका सदस्याने बाबासाहेब आंबेडकर व इतरांचे स्मरण करून शपथेला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना राज्यपालांनी परत शपथ घ्यायला लावली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांचा उल्लेख केला. पण राज्यपालांनी त्यावेळी आक्षेप घेतला नाही,असे शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि राज्यपाल कार्यालयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -