घर महाराष्ट्र INDIA आघाडीचा लोगो ठरला; असा असणार…, राऊतांनी दिली माहिती

INDIA आघाडीचा लोगो ठरला; असा असणार…, राऊतांनी दिली माहिती

Subscribe

इंडिया आघाडीच्या लोगोमध्ये देशाचा रंग असेल, या देशातील एकतेचा रंग असेल, तसंच या देशाच्या स्वाभीमानाचा रंग हा या लोगोमध्ये असेल, असं राऊत म्हणाले. त्यामुळे आता या आघाडीचा लोगो कसा असणार याची उत्सुकता INDIAच्या समर्थकांना आहे. 

सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशभरातील बहुतांश विरोधी पक्षांनी मोट बांधली आहे. या इंडिया आघाडीच्या लोगोचं 31 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या बैठकीत अनावरण होणार आहे. इंडिया आघाडीच्या लोगोसाठी नऊ डिझाईन्स तयार करण्यात आले होते. त्यापैकी एका डिझाईनवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यावरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, इंडियाच्या लोगोमध्ये या देशाचा रंग असणार आहे. तसंच, या देशातील एकतेचा रंग असेल, असं ते म्हणाले. सोबतच शिंदे गटावरही त्यांनी सडकून टीका केली आहे. (INDIA Aghadi the leading logo It will be like this informed Sanjay Raut)

राऊत म्हणाले की, इंडियाची जी बैठक मुंबईत होणार आहे. ती बैठक खूप भव्य होईल. देश, विदेशातून नेतेमंडळी या बैठकीला उपस्थित राहतील. तसंच, या बैठकीला येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं स्वागत महाराष्ट्रीयन पद्धतीनं केलं जाणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. विदेशातील काही पत्रकार देखील आमच्याशी संवाद साधत आहेत. त्यांनाही ही बैठक कव्हर करायची आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची ही बैठक अतिशय भव्य होणार असल्याचं, राऊत यांनी सांगितलं आहे.

असा असेल INDIA चा लोगो

- Advertisement -

इंडिया आघाडीच्या लोगोचं 31 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या बैठकीत अनावरण होणार आहे. इंडिया आघाडीच्या लोगोसाठी नऊ डिझाईन्स तयार करण्यात आले होते. त्यापैकी एका डिझाईनवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. एका लोगोवर निर्णय घेण्यात आला आहे. या लोगोमध्ये देशाचा रंग असेल, या देशातील एकतेचा रंग असेल, तसंच या देशाच्या स्वाभीमानाचा रंग हा या लोगोमध्ये असेल, असं राऊत म्हणाले. त्यामुळे आता या आघाडीचा लोगो कसा असणार याची उत्सुकता INDIAच्या समर्थकांना आहे.

2024 ची लोकसभा निवडणूक ही जिंकण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि आम्ही जिंकतही आहोत, असं वक्तव्य राऊतांनी केलं. ही निवडणूक इंडिया म्हणजेच भारत जिंकेल. तसंच, ही लढाई जी आहे, ती देशाचं संविधान, कायदा आणि लोकतंत्र वाचवण्यासाठी असल्याचं म्हणत त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं.

- Advertisement -

( हेही वाचा: रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायची आहे; हसन मुश्रीफ थेटच बोलले )

जनता कचऱ्याप्रमाणे फेकून देईल

आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर उत्तर देण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी 6 हजार पानी उत्तर दाखल केलं आहे. त्यावर टीका करताना राऊतांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. राऊत म्हणाले की, 6 हजार पानी उत्तर दिलं आहे तर वाचत बसावं त्यांनी. शिंदे गटाला अजून वेळ मात्र गोठवण्याची जादू आलेली नाही. अजूनही देशात न्यायालयं आहेत. अध्यक्षांनी ते समजून घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासारहेब आंबडेकरांनी संविधान दिलं आहे. त्यानुसार कायद्याच्या चौकटीत राहून काम करायला हवं, असं म्हणत त्यांनी सल्लाही दिला. तसंच, जे कायद्याचं पालन करत नाहीत, त्यांना जनता कचऱ्याप्रमाणे फेकून देईल, असं वक्तव्यही राऊत यांनी केलं.

- Advertisment -