घरElection 2023"तीन राज्यांतील पराभवानंतरही INDIA आघाडी एकत्रच, 6 डिसेंबरला दिल्लीत महत्त्वाची बैठक"

“तीन राज्यांतील पराभवानंतरही INDIA आघाडी एकत्रच, 6 डिसेंबरला दिल्लीत महत्त्वाची बैठक”

Subscribe

जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी यांची कोणसोबत तुलना होऊ शकत नाही. मोदी त्यांच्या जागी मोठे नेता आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी मोदींची नेहरूंच्या तुलनेवर केले आहे.

मुंबई : देशात चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आले आहेत. यात मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाचा विजय झाला आहेत, तर काँग्रेसचा फक्त तेलंगणात विजय मिळाला आहे. कालच्या निकालानंतरही इंडिया आघाडी मजबुतीने उभी राहणार आहे, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली आहे. दिल्लीत इंडिया आघाडीची 6 डिसेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे, अशी माहिती संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.

चार राज्यांच्या निकालानंतर भाजपाची ताकत वाढणार का?, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “तीन राज्याच्या पराभवानंतरही इंडिया आघाडी मजबुतीने उभी राहणार आहे. दिल्लीत 6 डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठकी ही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीसाठी शिवसेना ( ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत. इंडिया आघाडीचे जे सदस्य आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकीसंदर्भात इंडिया आघाडीतील पक्षांचे जे काही रुसवा-फुगवा आहे. खास करून आपल्या राज्यात काँग्रेससारखी मोठा पक्ष असतो. तेव्हा त्या राज्यात छोटे-छोटे जे घटक आहेत, त्यांना विश्वासात घेतले गेले नाही. तुम्हाला जर इंडिया आघाडी पुढे घेऊन जाण्यासाठी मग तो पक्ष छोटा असो की मोठा तुमच्या राज्यात सर्वांना सोबत घेऊन गेला असता तर कदाचित मी असे म्हणत नाही की निवडणुकीचा संपूर्ण निर्णय बदलला असता. पण चांगला फायदा होऊ शकला असता.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : तीन राज्यातील BJP विजयानंतर शिवसेना नेते म्हणाले- “आम्ही EVM जनादेश स्वीकारला”

मोदींची तुलना पंडित नेहरूशी होऊ शकत नाही

विजयानंतर मोदींची तुलना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी तुलना केली जात आहे, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी यांची कोणसोबत तुलना होऊ शकत नाही. मोदी त्यांच्या जागी मोठे नेता आहे. ते भाजपचे शिखर पुरुष आहे. मोदींनी एक नवीन भाजपा उभे केले आहे. त्या भाजपाने मोदींच्या नेतृत्वा भरारी घेतली आहे. पण पंडित जवाहरलाल नेहरूनी देशाला बनवले आहे. पंडित नेहरू एक व्यक्तिमत्व आहे. ज्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. महात्मा गांधी यांचे वेगळे व्यक्तिमत्व आहे. लाल बहादुर शास्त्री आणि इंदिरा गांधी या वेगळे व्यक्तिमत्व आहे. या सर्वांनी त्यांच्या त्यांच्या काळात मोठे काम गेले आहेत. ते सर्वच्या स्मरणात राहतील.”

- Advertisement -

हेही वाचा – Mizoram Assembly Election Result 2023 : इंदिरा गांधीचे सुरक्षा प्रमुख CM पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे

अब तेरा क्या होगा कालिया

संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात काय होणार जे शिवसेनेसोबत 2014 मध्ये झाले. जेव्हा मोदींची लाट आल्यानंतर भाजपाने शिवसेनेसोबत युती तोडली. आता भाजपाला दुसरी लाट दिसून लागली आहे. तर मला काळजी आहे की, जे सरकारमध्ये भाजपासोबत बसलेले आहेत. मग आमचे बेईमान लोकांचा गट असो की, राष्ट्रवादी काँग्रेस असो आता त्यांचे काय होणार आहे. ‘अब तेरा क्या होगा कालिया’ असा प्रश्न विचारत हाणार आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले, “आता ते बघतील काय करायचे आहे ते. पण काँग्रेससोबत आमचे जे नाते आहे ते तसेच राहणार आहे. महाराष्ट्र पातळीवर संवाद सुरू आणि आम्ही दिल्लीत देखील बोलणी करणार आहे. आम्ही सर्वजण मिळून राज्याचे जागांची वाटाघाटी आराम करू.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -