परदेशी प्रवाशांसाठी आता भारतात नियम शिथिल, Air Suvidha फॉर्म भरण्याची सक्ती रद्द, RT-PCR चीही गरज नाही

india discontinues air suvidha forms for international passengers

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एअर सुविधा फॉर्म (Air Suvidha Form) भरण्याची सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत एक नोटीस जारी केले आहे. ज्यानुसार, भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांना यापुढे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही. 22 नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे.

आत्तापर्यंत प्रवाशांना बोर्डिंग करण्यापूर्वी एअर सुविधा फॉर्म भरणे बंधनकारक होते. मात्र यात प्रवाशांचा अधिक वेळ वाया जायचा, त्यामुळे हा फॉर्म रद्द करण्याची मागणी हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून केली जात होती.

दरम्यान सोमवारी संध्याकाळी नागरी उड्डाण मंत्रालयाने एक नोटीस जारी करत म्हटले की, जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. यात कोरोनाविरोधी लसीकरण वेगाने होकत असल्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘आंतरराष्ट्रीय आगमनांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे’ जारी केली आहेत. यानुसार आता ऑनलाइन हवाई सुविधा पोर्टलवरील ‘एअर सुविधा’ फॉर्म सादर करणे बंद करण्यात आले आहे. मात्र कोविड-19 ची परिस्थिती पाहता आणखी गरज पडल्यास हा नियम पुन्हा लागू केला जाईल.

यासोबतच आता आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात येणाऱ्या प्रवाशांनाही कोरोनाची लस घेणे बंधनकारक नाही. मात्र प्रवाशांत्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लसीकरण करणे चांगले आहे. अलीकडेच मंत्रालयाने मास्क सक्तीचा निर्णय रद्द केला होता, यामुळे मास्क परिधान न करणाऱ्यांकडूनही कोणताही दंड घेतला जात नाही.

ऑगस्ट 2020 मध्ये कोरोना महामारी शिखरावर असताना एअर सुविधा पोर्टल सुरू करण्यात आले. याl हवाई सुविधा फॉर्मद्वारे परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची संपूर्ण नोंद ठेवली जात आहे. जसे की हा प्रवासी कोणत्या देशातून आला, तो कोठे जात आहेत, त्याचा पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता, पासपोर्ट तपशील, संशयास्पद लक्षण. यात ज्या प्रवाशाला कोरोनाची लागण झाली आहे असे दिसले तर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना ओळखता यावे आणि गरज पडल्यास त्यांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी मदत होत होती. या फॉर्मचा नोंदणी क्रमांक दिल्यानंतरच विमान कंपन्यांकडून बोर्डिंग पास जारी करण्यात येत होता.

कोरोना काळात भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना एअर सुविधा फॉर्म (Air Suvidha Form) भरण्याची सक्ती होती. यात प्रवाशांच्या त्यावेळची आरोग्याची स्थितीची सविस्तर माहिती घेतली जायची. सोबतच प्रवाशांना वॅक्सिन सर्टिफिकेट आणि निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट भरावा लागायचा. नव्या नियमानुसार आता या दोन्ही गोष्टी करण्याची गरज नाही.


पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, डी गँगकडून मुंबई पोलिसांकडे आला धमकीचा मेसेज