घरमहाराष्ट्रनाशिकभारताला कांदा निर्यातीतून ८ महिन्यांत २२९५ कोटींचे परकीय चलन

भारताला कांदा निर्यातीतून ८ महिन्यांत २२९५ कोटींचे परकीय चलन

Subscribe

केंद्र शासनाने कांदा निर्यातीसाठी ठोस पावले उचलण्याची गरज

लासलगाव : उत्कृष्ट स्वादामुळे जगाच्या पाठीवर ओळख निर्माण करणार्‍या कांदा निर्यातीतून देशाला एप्रिल २०२१ ते नोव्हेंबर २०२१ या आठ महिन्यात १० लाख ५५ हजार मॅट्रिक टन कांदा निर्यात होऊन २२९५ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे. पुरवठ्यातील सातत्य, विश्वासार्हता आणि कमी कालावधीत दर्जेदार कांदा पोहचविण्याची भारतीय निर्यातदारांची क्षमता यामुळे कांदा निर्यात सुरू आहे.केंद्राने शेतमाल निर्यातीसाठी दीर्घकालीन धोरण अवलंबल्यास निर्यातीत लक्षणीय वाढ होऊ शकते. सध्या बाजार समितीत लाल कांदा विक्रीस येत असून सर्व साधारण दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे. मात्र बदलत्या वातावरणाने कांदा उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकर्‍यांना या भावाचा काही फायदा होत नसल्याचे शेतकरी वर्ग सांगत आहे.

बाजारात नवीन लाल कांद्याची आवक वाढत आहे तरी केंद्र शासनाने कांदा निर्यातीसाठी ठोस धोरण जाहीर करून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा दिला पाहिजे. कोरोनासारख्या महामारीत समाधानकारक कांदा निर्यात होऊन देशाला आठ महिन्यांत २२९५ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे. केंद्राने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना, कंटेनर भाड्यात घट, ट्रान्झिन्ट अनुदान या उपाययोजना केल्यास निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळेल.

- Advertisement -

 या आहेत उपाययोजना 

  • कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू व्हावी
  •  कागदपत्रांची क्लिष्टता नसावी
  •  निर्यातीसाठी दिर्घकालीन धोरण आवश्यक
  •  कंटेनर भाड्यात घट होणे आवश्यक
  •  किसान रेलची उपलब्धता आवश्यक
  • ट्रान्झिन्ट अनुदान अपेक्षीत

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -