घरताज्या घडामोडीदेशातील पहिला हायड्रोजन प्रकल्प होणार पुण्यात, ३५० कोटींची गुंतवणूक

देशातील पहिला हायड्रोजन प्रकल्प होणार पुण्यात, ३५० कोटींची गुंतवणूक

Subscribe

देशातील पहिल्या हायड्रोजन प्रकल्पाची उभारणी पुण्यात करण्यात येणार आहे. द ग्रीन बिलीयन्स लिमिटेड (टीजीबीएल) ही कंपनी पुण्यात हायड्रोजन उत्पादनासंदर्भात प्रकल्प उभारणी करणार आहे. तसेच या प्रकल्प उभारण्यासाठी कंपनीकडून ३५० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. दरम्यान कंपनीने या संदर्भात तब्बल ३० वर्षांसाठी पुणे महानगरपालिकेशी करार केला आहे.

टीजीबीएलचे अध्यक्ष आणि संस्थापक प्रतीक कनाकिया यांनी या प्रकल्पासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. आम्ही ३५० टन घनकचऱ्यापासून दररोज १० टन हायड्रोजन तयार करण्याची योजना आखत आहोत. आम्ही हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये प्रकल्प उभारत आहोत. घनकचऱ्यापासून हायड्रोजन मिळवण्याचा देशातील हा पहिलाच प्रयत्न आहे. तसेच प्रकल्प उभारण्यासाठी कंपनी ३५० कोटींची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती प्रतीक कनाकिया यांनी दिली.

- Advertisement -

घनकचऱ्यापासून हायड्रोजन निर्मितीचा हा पहिला प्रकल्प आहे. यातील पहिला १० टन रिएक्टर नोव्हेंबर २०२३ पर्यंत स्थापित केले जाणार आहे आणि संपूर्ण प्रकल्प नोव्हेंबर २०२४ पर्यंत कार्यान्वित केला जाणार आहे. कचऱ्यापासून निर्माण झालेल्या इंधनाचा उपयोग प्लाझ्मा गॅस निर्मिती तंत्रज्ञानाद्वारे हायड्रोजन निर्मितीसाठी केला जाणार आहे.

या कंपनीला भाभा परमाणू अनुसंधान संस्थान आणि भारतीय विज्ञान संस्थान, बंगळुरू यांची मदत मिळाली आहे. कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मितीची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता दर्शविणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. कचऱ्यामध्ये बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल आणि घरगुती घातक कचऱ्याचा समावेश असेल. त्यामुळे ऑप्टिकल सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातील ग्रीनबिलियन्स प्लांटमध्ये विलगीकरण केलं जाणार आहे. त्याचबरोबर ८२ कोटी रुपये स्टोरेज सुविधा आणि लॉजिस्टिक गरजांवर खर्च केले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मालाड येथील रस्ता रुंदीकरणात २७ बांधकामांवर हातोडा, वाहतूक समस्या लवकरच


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -