घर महाराष्ट्र 'इंडिया' हिंदू आणि सनातन धर्माविरोधी - निर्मला सीतारामन

‘इंडिया’ हिंदू आणि सनातन धर्माविरोधी – निर्मला सीतारामन

Subscribe

मुंबई : विरोधकांची आघाडी इंडियाला हिंदू आणि सनातन धर्मा विरोधी आहे, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एनडीटीव्ही इंडियाला दिलेल्या मुलाखतीत केली आहे. या मुलाखतीत निर्मला सीतारामन यांनी डीएमके नेता आणि मंत्री उदयनिधी स्टालिन आणि काँग्रेस यांच्या खरपूस समचार घेतला आहे.

डीएमके नेता आणि मंत्री उदयनिधी स्टालिन हा सनातन धर्म संपवणार आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या. काँग्रेसवर टीका करताना म्हणाल्या, “काँग्रेसवर ही सर्वात जुना पक्ष असून ते अशा ग्रुपचे समर्थन करते की, जे भारत तोडण्याचा विचारात आहेत. डीएमके हे एंटी सनातन राहिली आहे”, असेही त्यांनी मुलाखतीत म्हटले.

डीएमकेची फार पूर्वापासूनची परंपरा

- Advertisement -

निर्मला सितारामन म्हणाल्या, “तामिळनाडूच्या लोकांनी नेहमी त्यांना सहन केले आहे. देशातील बाकीच्या राज्यांना भाषा करत नसल्याने ते समजत नाही. गेल्या 70 वर्षापासून डीएमके असे करत आहेत. आता सोशल मीडियाच्या काळात लोकांना ट्रांसलेटरची गरज पडत नाही आणि आता लोकांना सहज समजते की डीएमकेच्या नेत्यांनी काय सांगितले.”

हेही वाचा – निवडणुका जवळ आल्या की जातीय दंगली घडवल्या जातात; विश्वजीत कदमांचा सरकारवर गंभीर आरोप

G-20 शिखर परिषदेसंदर्भात निर्मला सितारमन म्हणाल्या…

- Advertisement -

देशात नुकतेच G-20 शिखर परिषदेच्या यशासंदर्भात निर्मला सितारामन म्हणाल्या, “G-20 शिखर परिषदे यशावर आनंद व्यक्त केला आहे. फायनान्स ट्रॅकने यात मोठी भूमिका बजावली आहे. भारताने सर्व महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर एकमत केले.” क्रिप्टो मालमत्तेच्या नियमनाबाबत निर्मला सीतारमण म्हणाले की, “या देशांनी वेगवेगळी धोरणे स्वीकारली तर ते चांगले होणार नाही. सामूहिक कृती होणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी सखोल चर्चा आवश्यक आहे.”

- Advertisment -