घर महाराष्ट्र INDIA meet : विश्वातील एकमेव..., मनसेच्या टीकेवर काँग्रेसचा पलटवार

INDIA meet : विश्वातील एकमेव…, मनसेच्या टीकेवर काँग्रेसचा पलटवार

Subscribe

मुंबई : विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची बैठक मुंबईतील ग्रॅण्ड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये होत आहे. आज, गुरुवार आणि उद्या, शक्रवारी चालणाऱ्या या बैठकीला देशभरातील 28 पक्ष सहभागी होणार आहेत. त्यामुळे विविध महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा बेत आखण्यात आला आहे. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यावरून टीका केली आहे. तर, काँग्रेसने त्यावर पलटवार केला आहे.

- Advertisement -

भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ‘अब की बार मोदी सरकार’चा नारा देत 2014मध्ये केंद्रात सत्तेवर आल्यानंतर 2019मध्येही रालोआने निर्विवाद बहुमत मिळविले. या निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला, परंतु कोलकात्यातील रॅलीच्या पुढे त्यांची ही एकी टिकलीच नाही. त्या निवडणुकीला प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे सामोरा गेला. त्यामुळे रालोआला तसा विरोध झाला नाही.

हेही वाचा – काल-परवापर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना…, आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

- Advertisement -

आता 2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात हुकूमशाही येत असल्याचा आरोप करत विरोधकांनी आता एकजूट दाखविली आहे. 23 जून 2023 रोजी विरोधकांची पहिली बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली. त्या बैठकीला 15 विरोध पक्ष उपस्थित होते. त्यानंतर दुसरी बैठक 18 जुलै 2023 रोजी बंगळुरूमध्ये झाली. या बैठकीत 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे ‘इंडिया’ असे नामकरण करण्यात आले. आता ‘इंडिया’ नामक विरोधकांच्या आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीसाठी ठेवण्यात आलेल्या मेन्यूचीही चर्चा रंगली आहे.

या मेन्यूवरून मनसेनेते अमेय खोपकर यांनी टीका केली आहे. राज्यात तीन आठवड्यांपासून पाऊस गडप झालाय. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. दुष्काळाचे संकट गहिरे होत आहे. मविआ नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करत आहेत आणि दुसरीकडे I.N.D.I.A. आघाडी बैठकीआधी राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वान्नाच्या पंगती उठत आहेत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाजही वाटत नाही. सत्तापिपासू नेत्यांच्या या भाऊगर्दीत जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा एकच पक्ष आहे आणि मी अशा मनसे पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – बाळासाहेब हिंदू शेर म्हणून लोकप्रिय होते तर…, इंडिया बैठकीवरून भाजपाची बोचरी टीका

तर, विश्वातील एकमेव भरकटलेले रेल्वे इंजिन…., असे एका ओळीचे ट्वीट करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पलटवार करताना, मोदी सरकारबाबत मनसे नेते राज ठाकरे यांनी घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकांवरही बोट ठेवले आहे.

- Advertisment -