घरCORONA UPDATE‘भारत पढे ऑनलाईन’ मोहिम; ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत मागवल्या सूचना!

‘भारत पढे ऑनलाईन’ मोहिम; ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत मागवल्या सूचना!

Subscribe

शिक्षण पद्धतीतील उपलब्ध डिजिटल माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यास प्रोत्साहन देणे, तसेच त्यासंबधीच्या अडचणीवर मात करण्यासाठीच्या सूचना आणि उपाय एकत्र मागवण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आठवडाभराची 'भारत पढे ऑनलाईन मोहिम' जाहीर केली.

शिक्षण पद्धतीतील उपलब्ध डिजिटल माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यास प्रोत्साहन देणे, तसेच त्यासंबधीच्या अडचणीवर मात करण्यासाठीच्या सूचना आणि उपाय एकत्र मागवण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आठवडाभराची ‘भारत पढे ऑनलाईन मोहिम’ जाहीर केली. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी देशातील हुशार व्यक्तींनी पुढाकार घेऊन आपल्या सूचना आणि उपाय थेट मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे मांडाव्यात या हेतूने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिक्षक तसेच विद्यार्थी हे या मोहिमेचे मुख्य लक्ष्य आहेत. सध्या उपलब्ध डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग विद्यार्थी विविध अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी करत असतात. सध्या शालेय विद्यार्थी तसेच उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी उपलब्ध डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे विविध अभ्यासक्रम शिकण्यासाठी वापरत असतात. या उपलब्ध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्यांना ज्या उणीवा जाणवतात. त्या ते शेअर करू शकतील तसेच त्यावर मात करण्यासाठी काय करता येईल याच्या सूचनाही ते देऊ शकतील, असे निशंक यांनी सांगितले.

देशभरातल्या सर्व शिक्षकांनी त्यांचे शिक्षण क्षेत्रातले कौशल्य आणि अनुभव यांच्यासह योगदान देण्यास पुढे यावे, असे त्यांनी म्हटले आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे भारतातील सध्याचे चित्र, तसेच परंपरागत शिक्षण पद्धतीत ज्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. त्यावर तोडगा काढण्यासाठी ऑनलाइन पद्धती कशी उपयुक्त ठरते इथपासून सुरुवात करावी लागेल, असं निशंक म्हणाले. निशंक यांनी सर्व भारतीयांना देशात ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या विकासासाठी होत असलेल्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांच्या कल्पना आणि सूचना [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा किंवा ट्विटरवर #BharatPadheOnline वापरुन @HRDMinistry किंवा @DrRPNishank यांना १६ एप्रिलपूर्वी टॅग करण्यात याव्यात, असे आवाहन त्याने केले आहे. तसेच या सुचनांची आपण स्वत: हून दखल घेऊ असेही निशंक यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -