Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यातून बेपत्ता; मोबाईलही बंद

क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यातून बेपत्ता; मोबाईलही बंद

Subscribe

केदार जाधव हा बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. २०१९ च्या वनडे वर्ल्ड कपनंतर केदार जाधव टीम इंडियाकडून कधीच खेळला नाही.

Kedar Jadhav’s Father Missing : टीम इंडियाचा क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील बेपत्ता झाल्याची बातमी समोर येत आहे. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पुण्यातून ते बेपत्ता झाल्याचं सांगण्यात येत आहे. पुणे पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाले आहेत. पुण्यातील कोथरूड भागातून आज (सोमवार) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास सुमारास रिक्षाने घराबाहेर पडले. त्यानंतर आत्तापर्यंत त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. याहूनही चिंतेत टाकणारी बाब म्हणजे त्यांच्याकडे असलेला मोबाईल फोन सुद्धा वारंवार बंद असल्याचं दाखवत आहे. त्यामुळे जाधव कुटूंबीय आणखी चिंतेत पडले आहेत. केदार जाधव हा त्याच्या कुटुंबासोबत पुण्याच्या कोथरूड भागात राहतो. अखेर जाधव कुटूंबियांनी पोलिस स्टेशनकडे धाव घेत याबाबत रितसर तक्रार दाखल केलीय.

- Advertisement -

केदार जाधवचे वडील महादेव जाधव हे ज्या रिक्षाने गेले त्या रिक्षाचालकाचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. या रिक्षाचालकाचा शोध लागला की केदार जाधवचे वडील रिक्षेतून नेमके कुठे उतरले आणि नंतर कुठे गेले, याची माहिती मिळू शकते.

केदार जाधव हा बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. २०१९ च्या वनडे वर्ल्ड कपनंतर केदार जाधव टीम इंडियाकडून कधीच खेळला नाही. काही दिवसांपूर्वीच त्याने आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. पण महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू रणजी सामना खेळत असताना तो मधूनच बाहेर पडला. एक खाजगी कारण देत केदार या सामन्यातून बाहेर पडला होता. पण बारामती इथल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासोबत दिसून आला. एक महत्वाची क्रिकेट स्पर्धा सुरु असताना असं खोटं कारण देत त्यातून बाहेर पडला आणि लगेच दुसऱ्या कार्यक्रमात तो दिसला असल्यानं यावरून मोठी चर्चा रंगली होती.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -