Homeदेश-विदेशIndian Economy : देशाच्या अर्थव्यवस्थेचे डबके झाले आहे, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर...

Indian Economy : देशाच्या अर्थव्यवस्थेचे डबके झाले आहे, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर घणाघात

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत अत्यंत तकलादू लोक अर्थमंत्रीपदावर विराजमान केले. त्यांनी अर्थव्यवस्थेचा साफ खेळखंडोबा केला.

(Indian Economy) मुंबई : भारत भविष्यात पाच ट्रिलियन डॉलर अशी महाकाय अर्थव्यवस्था होणार असल्याचे सांगितले जाते. भारतात परकीय गुंतवणूक येईल आणि रोजगार वाढेल, गरिबी दूर होईल अशा भाषणांनी कान विटले आहेत. केंद्र सरकार देशातील 85 कोटी लोकांना फुकट धान्य देते तेव्हा त्यांची दोन वेळची चूल पेटते. नोकऱ्यांचा तर बाजार उठला आहे. पंजाबचा शेतकरी शेतीमालास बाजारभाव मिळावा म्हणून आंदोलनास उतरला आहे. हे वातावरण उत्साहवर्धक नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. (Thackeray group criticizes Modi government regarding country’s economy)

देशाची अर्थव्यवस्था प्रवाही नसून त्याचे डबके झाले आहे. हे डबके म्हणजे पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असा कोणी दावा करीत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात आहेत. कुंभ सोहळे, राममंदिराची उद्घाटने, मशिदींचे खोदकाम करणे अशांवर हजारो कोटींचा खर्च होत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी हजारो कोटी ‘फुकट रेवडी’ योजना जाहीर होतात. त्यात ‘लाडकी बहीण’सारख्या योजना आहेत. या सर्व योजनांसाठी कर्ज काढावे लागते. त्या कर्जावर देशाचा गाडा हाकला जातो, अशी घणघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : ‘ठाकरे गट झोपलेला,’ अमोल कोल्हेंच्या विधानावरून राऊतांनी सुनावलं; म्हणाले, “याचा अर्थ असा नाही की…”

एक-दोन उद्योगपतींचीच भरभराट सरकारी कृपेने होत आहे आणि बाकीच्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जात आहेत. देशाचे वातावरण उद्योग-व्यापारासाठी स्वच्छ आणि मोकळे राहिलेले नाही. गेल्या दहा वर्षांत भारतातील पाच लाख मध्यम उद्योजक तसेच गुंतवणूकदार हे परदेशात जाऊन स्थायिक झाले. त्यामुळे परदेशातून गुंतवणूक येत आहे असे सांगणे हे खोटेपणाचे आहे, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत अत्यंत तकलादू लोक अर्थमंत्रीपदावर विराजमान केले. त्यांनी अर्थव्यवस्थेचा साफ खेळखंडोबा केला. मोदींनी जबरदस्तीने लादलेल्या नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्थेचे जगात हसे झाले आणि रुपयाला कायमची घरघर लागली. भारतीय चलनात आजही मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा ओघ आहे आणि काळा पैसा मोठ्या प्रमाणात परदेशी बँकांत आहे, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. (Indian Economy: Thackeray group criticizes Modi government regarding country’s economy)

हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : कालपर्यंत ईव्हीएमला दोष देणारे…, मविआतील वादावर बावनकुळेंचे टीकास्त्र

Manoj Joshi
Manoj Joshi
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.