घरताज्या घडामोडीकरोना : भारताकडून १० लाख टेस्टिंग किट्सची ऑर्डर

करोना : भारताकडून १० लाख टेस्टिंग किट्सची ऑर्डर

Subscribe

भारतात कम्युनिटी टेस्टिंग करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यासाठी आता केंद्र सरकारने तयारी केली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागामार्फत न्युमोनिया आणि श्वसनाच्या आजार असलेल्या रूग्णांचे रॅण्डम सॅम्पल घेण्यात आले आहे. या सॅम्पलच्या चाचणी निकालानंतरच कम्युनिटी टेस्टिंगचा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. हे असे रूग्ण आहेत ज्यांना कोणतीही परदेश दौऱ्याची पार्श्वभूमी नाही. तसेच परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या हे रूग्ण संपर्कात आलेले नाहीत अशा रूग्णांचीच चाचणी करण्यात आली आहे. लोकांमधूनच या व्हायरसचे संक्रमण होत आहे का याचा तपास घेण्यासाठीच बुधवारी चाचणीचे येणारे निकाल अतिशय महत्वपूर्ण असणार आहेत. सरकारने कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका लक्षात घेऊनच दहा लाख अतिरिक्त टेस्टिंग किट्सची ऑर्डर केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. तसेच टेस्टिंग लॅबोरटीरजचे जाळेही आणखी विस्तारीत करण्यात येणार आहे असे सरकारमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आता ही सगळी तयारी सुरू करण्यात आली आहे असे इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे मुख्य एपिडेमिओलॉजिस्ट डॉ रमण गंगाखेडकर यांनी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ही बाब स्पष्ट केले.

आयसीएमआरने देशभरातून ५२ लॅब्सच्या माध्यमातून १०४० सॅम्पल गोळा केले होते. अनेक हॉस्पिटलमध्ये आयसीयुमध्ये एडमिट असलेल्या तसेच खाजगी हॉस्पिटलमधीलही हे सॅम्पल होते. आतापर्यंत या गोळा करण्यात आलेल्या सॅम्पलमध्ये कोणत्याही रूग्णामध्ये कोविड १९ म्हणजे करोनाची लक्षणे आढळली नाहीत. तसेच त्यांची चाचणीही पॉझिटीव्ह आलेली नाही. म्हणूनच आता बुधवारी येणाऱ्या निकालानंतरच अनेक गोष्टी स्पष्ट होतील. सध्या ६३ ठिकाणी या चाचण्यांचा अहवाल तयार करण्यात येत आहे. तसेच आणखी ९ लॅबची यामध्ये भर पडणार आहे. सध्या देशात ५७ कलेक्शन सेंटर उभारण्यात आले आहेत. देशभरातील लॅबमधून आतापर्यंत ९११७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १२४ जणांच्या चाचण्या या करोना पॉझिटीव्ह आढळल्या आहेत. एका चाचणीचा अंतिम निकाल मिळण्यासाठी २४ तासांचा कालावधी सध्या गरजेचा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -