घरताज्या घडामोडीमुंबईत 13, 14 आणि 16 सप्टेंबरला हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

मुंबईत 13, 14 आणि 16 सप्टेंबरला हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Subscribe

मुंबईसह उपनगरात रात्री जोरदार पाऊस पजत आहे. जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार मुंबईला आज म्हणजेच 13 सप्टेंबर आणि 14 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, 15 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट असेल.

मुंबईसह उपनगरात रात्री जोरदार पाऊस पजत आहे. जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार मुंबईला आज म्हणजेच 13 सप्टेंबर आणि 14 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, 15 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट असेल. त्यानंतर पुन्हा एकदा 16 सप्टेंबरला मुंबईत यलो अलर्ट असेल. मुंबईत सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे अनेक परिसारात पाणी साचले आहे. (Indian Meteorological Department issues yellow alert for Mumbai Thane and Sindhudurg)

मुंबईत मंगळवारी पहाटेपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले होते. अंधेरी सबवे परिसरात पाणी साचलं होते. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात जोरदार पावसाने सोमवारी रात्री पासूनच हजेरी लावली.

- Advertisement -

दरम्यान, मुंबई उपनगरातील सांताक्रूझ, कांदिवली आणि अंधेरीत मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाने मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईतील काही सबवे हे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यानं मुंबईचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.

15 आणि 16 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत गेल्या दोन दिवसांत पावसाचा तितकाचा जोर नव्हता. मात्र सोमवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा मुसळधार हजेरी लावली. त्यानंतर आता येत्या 48 तासांनंतर पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

- Advertisement -

मुंबईत गणपती विसर्जन म्हणजेच अनंत चतुर्थीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे सकाळी कडक उन आणि संध्याकाळी पाऊस पडत आहे. संध्याकाळी पडत असलेल्या पावसामुळे कामावरून सुटणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.


हेही वाचा – भोपाळमध्ये 3 वर्षाच्या चिमुरडीवर शाळेच्या बसमध्ये बलात्कार; चालकासह महिलेला अटक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -