घरदेश-विदेशIndian Navy Day : भारतीय नौदलाने बॉलिवूड महानायकाच्या आवाजातील खास व्हिडीओ केला...

Indian Navy Day : भारतीय नौदलाने बॉलिवूड महानायकाच्या आवाजातील खास व्हिडीओ केला शेअर

Subscribe

आज सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग : आजचा दिवस हा नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा नौदल दिन मालवण-तारकर्ली समुद्रातील बलाढ्य अशा सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केल्या जाणार आहे. भारतीय नौदलाकडून छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली जाणार आहे. आज सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक दिनानिमित्ताने सिंधुदुर्गात काही खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या नौदल दिनाच्या आधीच नौदलाने त्यांच्या ट्विटर हँडलवर बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील हा खास व्हिडीओ नौदलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून करताना म्हटले की, भारतीय नौदलच्या पराक्रमाचा आणि अष्टपैलुचा साक्षीदार व्हा, “जलमेव यस्य, बलमेव तस्य” या प्राचीन मंत्राचे उदाहरण देते, जे भारताच्या समृद्धी आणि कल्याणासाठी आमच्या अदम्य नौसेना सामर्थ्याचे महत्त्वपूर्ण प्रासंगिकतेचे प्रदर्शन करते.”

- Advertisement -

हेही वाचा – PM MODI : विजयाची Hat-Trick लावल्यानंतर पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

- Advertisement -

नौदल दिन कार्यक्रमाला लावणार हजेरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून, ते सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची तयारी पूर्ण झाली असून, दोन ते तीन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली होती. असे असतानाच पंतप्रधान मोदी तीन राज्यात मिळालेल्या घवघवी यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील विरोधकांवर कोणत्या शब्दांत हल्ला चढवतात हे पहावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -