घरताज्या घडामोडीआता सौर ऊर्जेवर बनवा जेवण, आयओसीकडून सोलर चूलची निर्मिती; सरकार सबसिडीही देणार

आता सौर ऊर्जेवर बनवा जेवण, आयओसीकडून सोलर चूलची निर्मिती; सरकार सबसिडीही देणार

Subscribe

घरगुती सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एक हजार पार गेलेल्या सिलिंडरमुळे गृहणींचे बजेट कोलमडले आहे. आधीच महागाईमुळे (Inflammation) स्वयंपाकाला लागणारी साधने महाग झाली असताना सिलिंडरही महाग होत असल्याने सामान्य नागरिकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (Indian Oil IOCL) आता एलपीजी सिलिंडरला पर्याय म्हणून सोलर चूल बाजारात आणला आहे. ही चूल सोलारवर चालणारी असली तरीही तुम्ही रात्रीही चुलीचा वापर करू शकता. घराबाहेर लावलेल्या पॅनल्समधील सौरऊर्जेवर ही चूल चालते. यामुळे तुम्ही दिवसांतून तीन वेळा अन्न शिजवू शकता. (Indian Oil IOCL Launch Today Indoor Solar Cooking Stove SURYA NUTAN Price Less Than One Year Of LPG Cylinder Gas)

हेही वाचा अखेर प्रतिक्षा संपली! Twitter युजर्ससाठी एडिट बटण होणार जारी

- Advertisement -

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात या सोलर चुलीवर शिजवलेले अन्न देण्यात आले. पुरी म्हणाले की, या चुलीच्या खरेदीच्या खर्चाव्यतिरिक्त कोणत्याही देखभालीचा खर्च येत नाही आणि अपारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून या चुलीकडे पाहिले पाहिजे. फरीदाबादमधील आयओसीच्या संशोधन आणि विकास विभागाने ही चूल विकसित केली आहे.

हेही वाचा  – कोरोना लहान मुलांची पाठ काही सोडेना; 46 टक्के मुलांना पोस्ट कोविडचा त्रास

- Advertisement -

आयओसीचे निर्देशक एस.एस.वी रामकुमार यांनी सांगितलं की, या चुलीला सूर्य नुतन असं नाव देण्यात आलंय. ही चूल सौर कुकरपेक्षा वेगळी आहे. या चुलीला उन्हात ठेवण्याची गरज नाही. चार जणांचं कुटुंब असलेल्या घरात तीन वेळचं जेवण बनवण्याकरता ही चूल उपयोगाला येऊ शकते.

सूर्य नूतन चूल ही सौर ऊर्जेवर चालणारी चूल असली तरी ही चूल उन्हात पेटवण्याची गरज नाही. छतावर असलेल्या सोलर प्लेटमधील ऊर्जा एका केबलद्वारे या चुलीला जोडण्यात येते. सोलार प्लेटमधून जी ऊर्जा निर्माण होते ती केबलद्वारे चुलीपर्यंत पोहोचते. अशापद्धतीने सूर्य नुतन चूल पेटवली जाते.

हेही वाचा – अफगाणिस्तानातील भूकंपात मृतांचा आकडा 1 हजाराच्या वर

रात्रीही पेटवू शकाल सौर चूल

सौर चूल तुम्ही फक्त दिवसाच पेटवू शकता असं नाही. सोलार प्लेटच्या माध्यमातून थर्मल बॅटरीमध्येही ऊर्जा साठवली जाते. ज्याचा उपयोग तुम्ही रात्री चूल पेटवण्याकरता करू शकता.

किंमत अगदी अत्यल्प

IOC ने नुकतेच सूर्या नूतनचे प्रारंभिक मॉडेल सादर केले आहे. व्यावसायिक मॉडेल लाँच व्हायचे आहे. सध्या देशभरात ६० ठिकाणी याची चाचणी घेण्यात आली आहे. IOC नुसार, सूर्या नूतनची किंमत १८ हजार ते ३० हजार रुपयांच्या दरम्यान असेल. यावर शासन अनुदानही देणार आहे. सबसिडीनंतर त्याची किंमत १० हजार ते १२ हजार रुपये असू शकते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -