घरताज्या घडामोडीजेव्हा गब्बर स्वतःच 'क्वॉरनटाइन' होतो

जेव्हा गब्बर स्वतःच ‘क्वॉरनटाइन’ होतो

Subscribe

भारताचा सलामीवीर असलेला डावखुरा फलंदाज शिखर धवन याने नुकताच जर्मनी दौरा केला. पण भारत गाठताच त्याने स्वतःला क्वॉरनटाइन करून घेतले आहे. जर्मनीमध्ये पुरवण्यात येणाऱ्या सुविधांपेक्षा भारत सरकारने पुरवलेल्या सुविधा या अनेकपटीने चांगल्या आहेत, असा व्हिडिओ शिखर धवनने आपल्या फेसबुक पेजवरून शेअर केला आहे. स्वतः शिखर धवनने आपल्या फेसबुकच्या पेजवरून दिल्लीतील क्वारनटाइन सेंटरची सद्यस्थिती शेअर केली आहे. धवन असलेल्या सेंटरमधून टॉपने हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.

Just saw this video which I'm resharing.. Thank you to everyone taking necessary measures to make sure our country is safe. ?

Shikhar Dhawan ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಮಾರ್ಚ್ 16, 2020

- Advertisement -

अनेक सोशल मिडिया युजर्सने करोनाशी संबंधित सोयीसुविधांमध्ये असणाऱ्या कमतरता, स्वच्छता यासारख्या गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यामुळे भारतात परतणाऱ्यांच्या मनात अनेक शंका उपलब्ध होत आहेत. पण शिखर धवनने मात्र याबाबत समाधान व्यक्त करत भारतातील करोना प्रतिबंधासाठी दिलेल्या सुविधांचे कौतुक केले आहे. धवनने आपल्या व्हिडिओमध्ये क्वारनटाइन सेंटरमध्ये पुरवलेल्या सुविधांबाबतची माहिती जाहीर केली. दिल्लीतील क्वॉरनटाइन सेंटरमध्ये ७० किलोमीटरपासून दूरच्या जागेवरील देण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली आहे. मला २४ तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. दिल्ली पोलिस तसेच सर्व यंत्रणा करोना प्रतिबंधासाठी सर्व खबरदारी घेत आहे. प्रत्येकाला स्वतंत्र रूम देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पिण्याचे पाणी, चांगले अन्न, नवीन स्लीपर्स, मॉस्किटो रिपेलंट अशा सुविधा देण्यात आल्या आहे. दिल्लीतील तयारीचे कौतुक करत दिल्ली सरकारचे त्यांनी कौतुकही केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -