नंदुरबार : आपण सर्वांनी सोशल मीडियावर अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी वाचल्या किंवा बघितल्या असतील. पण तुम्ही आपल्या भारतातील एक अनोखे रेल्वे स्थानकाबद्दल माहिती आहे का? या रेल्वे स्थानकाचा एक भाग महाराष्ट्रात येतो तर, दुसरा भाग हा गुजरातमध्ये आहे. हे रेल्वे स्थानक पाहाण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करतात.
देशातील हे अनोखे रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आहे. या रेल्वे स्थानकाचे नाव ‘नवापूर’ असे आहे. नवापूर रेल्वे स्थानकाचे आणखी एक वैशिष्यपूर्ण गोष्ट म्हणजे स्थानकाची तिकीट खिडकी महाराष्ट्रात आहे तर, स्टेशन मास्तर हे गुजरातमध्ये बसतात. ऐवढेच नाही तर नवापूर रेल्वे स्थानकावर हिंदी, गुजरात, इंग्रजी आणि मराठी या चार भाषामध्ये माहिती लिहली आहे. या रेल्वे स्थानकाबद्दल रेल्वे परीक्षा व्यतिरिक्त एसएससी, सीएचएसएल आणि यूपीएससी यासारख्या परीक्षेत या रेल्वे स्टेशनबद्दल प्रश्न विचारला जातो.
हेही वाचा – Praful Patel : राजकीय जीवनामध्ये काही घडामोडी स्वीकाराव्या लागतात; प्रफुल्ल पटेल यांचे भाष्य
रेल्वे स्थानकामध्ये बाक झाला सेल्फी पाइंट
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्याचे विभाजन होण्यापूर्वीच रेल्वे स्थानकांची बांधणी झाली आहे. पण नवापूर हे रेल्वे स्थानक कोणत्या राज्यात येते याबद्दल काही निर्णय झाला नाही. त्यामुळे नवापूर रेल्वे स्थानकाचे विभाजान करण्यात आले. या रेल्वे स्थानकात पर्यटकांचे आकर्षनाचा केंद्र बिंदू हा एक बाक आहे. हा बाक अर्धा महाराष्ट्र आणि अर्धा गुजरातमध्ये आहे. या बाकावर बसून पर्यटक सेल्फी काढतात. त्यामुळे नवापूर रेल्वे स्थानकावरील हा बाक काय सेल्फी पॉइंट झाला आहे. नवापूर रेल्वे स्थानकाची एकूण लांबी 800 मीटर आहे, त्यापैकी 300 मीटर महाराष्ट्रात आणि 500 मीटर गुजरातमध्ये येते. या स्टेशनला तीन प्लॅटफॉर्म आणि चार रेल्वे ट्रॅक आहेत.