घरताज्या घडामोडीIndian Railway: गुटख्याच्या डागांच्या स्वच्छतेसाठी भारतीय रेल्वे मोजते 'इतके' कोटी

Indian Railway: गुटख्याच्या डागांच्या स्वच्छतेसाठी भारतीय रेल्वे मोजते ‘इतके’ कोटी

Subscribe

कोरोना काळातही स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र त्या काळातही गुटखा खाऊन थुंकण्याच्या सवयीत कोणताच बदल झालेला नाही

स्वच्छ भारत करण्यासाठी देशभरात स्वच्छता मोहीमेला चांगलाच वेग आला आहे. स्वच्छता अभियानातंर्गत सतत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. सरकारकडून देखील वारंवार सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जाते. मात्र शहरांपासून रेल्वे स्टेशनपर्यंत अस्वच्छता दिसते. अनेक वेळा समाजावून देखील सार्वजनिक रेल्वे स्टेशनवर गुटखा खाऊन थुंकण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. याचा मोठा फटका हा रेल्वेला बसतो. गुटख्याचे डाग साफ करण्यासाठी रेल्वेला करोडो रुपये खर्च करावे लागत आहेत.

भारतीय रेल्वे दरवर्षी रेल्वेतील गुटखा खाऊन थुंकलेले डाग साफ करण्यासाठी जवळपास १२०० करोड रुपये आणि लाखो लीटर पाण्याचा वापर करत आहे. रेल्वे स्टेशनची संख्या त्याचप्रमाणे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांमुळे ही संख्या दिसून येत नाही. कोरोना काळातही स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र त्या काळातही गुटखा खाऊन थुंकण्याच्या सवयीत कोणताच बदल झालेला नाही.

- Advertisement -

रेल्वेला देखील हा खर्च न परवडणारा असल्याचे रेल्वे या समस्येवर एक उपाय योजला आहे. रेल्वे स्पिटून वेंडिंग मशीन लावणार आहे. ज्यातून थुंकण्यासाठी स्टिटून पाउच लोक खरेदी करू शकतात. या पाउच ची किंमत केवळ ५-१०रुपये इतकी असेल. देशातील जवळपास ४२ रेल्वे स्थानकांवर याचे स्टॉल लावण्याचा रेल्वेचा प्लॉन आहे. भारतीय रेल्वेने पश्चिम, उत्तर आणि मध्य रेल्वेच्या या योजनेसाठी नागपूरच्या स्टार्टअप ईजीपिस्ट कंपनीला पाउच तयार करण्याचे कॉन्ट्रक्ट दिले आहे. ही थुंकण्याची पिशवी कोणीही आपल्या खिशात सहजपणे ठेवू शकतो. हा थुंकण्याचा पाऊच बायोडिग्रेडेबल असून तो १५-२० वेळा वापरला जाऊ शकतो. थुंकी त्या पाऊचमध्ये गेल्यानंतर त्याचे एका वेगळ्या पदार्थात रुपांतर होते. वापरुन झाल्यानंतर हा पाऊच मातीत गाडला किंवा कचरा कुंडीत फेकला तरी चालेल, असे सांगण्यात आले आहे.

नागपूरमध्ये पाउच तयार करणाऱ्या कंपनीने अनेक रेल्वे स्टेशन्सवर ईडीस्पिट वेंडिंग मशीन लावायला सुरुवात केली आहे. नागपूर आणि औरंगाबाद महानगर पालिकेशी कंपनीने करार केले आहेत. एकूण ४२ रेल्वे स्थानकांसोबत कंपनीने करार केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पाक, अफगाणिस्तान आणि इराणमधील येणारा माल मुंद्रा बंदरात उतरणार नाही, अदानी समूहाचा निर्णय

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -