घरताज्या घडामोडीMission Rail Karmayogi : 'रेल्वे कर्मयोगी' देणार प्रवाशांना सर्व माहिती; जाणून घ्या...

Mission Rail Karmayogi : ‘रेल्वे कर्मयोगी’ देणार प्रवाशांना सर्व माहिती; जाणून घ्या रेल्वेची नवी मोहिम

Subscribe

लखनौस्थित इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटला (IRITM) रेल्वे कर्मयोगी प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत एक असा व्यक्ती प्रवाशांच्या मदतीसाठी प्रत्येक ठिकाणी उभा करणार आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे तिकीटापासून बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा प्रवाशांना रेल्वे प्रवासापूर्वी समस्यांना तोडं द्यावे लागते. त्यानुसार, रेल्वे स्थानकात तिकीट बुक करण्यासाठी गेल्यास आरक्षणाचा फॉर्म कसा भरायचा ते माहित नसतं. ट्रेनची वाट पाहत असताना ट्रेन नेमकी कुठे येणार हेही अनेकदा माहित नसतं. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे प्रवाशांची ही गैरसोय आणि समस्या दुर करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने एक अनोखी मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेनुसार, रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘रेल कर्मयोगी’ उपस्थित असणार आहे. तसंच, हा रेल्वे कर्मयोगी प्रवाशांना मदत करणार आहे.

लखनौस्थित इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटला (IRITM) रेल्वे कर्मयोगी प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत एक असा व्यक्ती प्रवाशांच्या मदतीसाठी प्रत्येक ठिकाणी उभा करणार आहे. हा व्यक्ती म्हणजेच ‘रेल्वे कर्मयोगी’ रेल्वेशी संबंधित समस्या सोडवेल. तसेच, प्रवाशांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल?, आपल्याला हवा असलेला डबा कुठे असेल? आदींची सारी माहिती देणार आहे. भारतीय रेल्वे मंत्रालय मोठ्या स्थानकांवर प्रवाशांच्या मदतीसाठी ‘रेल्वे कर्मयोगी’ तैनात करणार आहे.

- Advertisement -

मिशन रेल कर्मयोगी प्रशिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. आतापर्यंत अशा 50 हजारांहून अधिक कर्मयोगींना प्रशिक्षित करून तैनात करण्यात आले आहे. खुद्द रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मिशन कर्मयोगी हा रेल्वे प्रवासी किंवा रेल्वे ग्राहकांचा अनुभव सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे.

या मोहिमेअंतर्गत देशभरात किमान एक लाख ‘रेल कर्मयोगी’ तयार केले जात आहेत. हे कर्मयोगी रेल्वे प्रवासी किंवा रेल्वेशी व्यावसायिक संबंध असलेल्या लोकांचा अनुभव आणखी सुधारणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Raj Thackeray Grandson : राज ठाकरेंच्या नातवाचा नामकरण सोहळा; ठेवलं ‘हे’ नाव

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -