घरCORONA UPDATECoronavirus : भारतीय उपचार पद्धती कोरोनावर करणार मात!

Coronavirus : भारतीय उपचार पद्धती कोरोनावर करणार मात!

Subscribe

आयुष टास्क फोर्सच्या सदस्य डॉ. शुभा राऊळ यांचा विश्वास

आयुष टास्क फोर्सने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना राज्य शासनाने मान्यता दिली. त्यामुळे, आयुर्वेदिक-होमिओपॅथी-युनानी च्या औषधांच्या मदतीने उपचार करून कोरोना प्रतिबंधक करण्यास मदत होणार आहे, असा विश्वास आयुष टास्क फोर्सच्या सदस्य डॉ. शुभा राऊळ यांनी व्यक्त केला.

कोरोना संसर्ग झालेला रुग्ण, सौम्य लक्षणे असलेला रुग्ण यावर आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार केले जाणार आहेत. कोरोनामुळे धास्तावलेल्या लोकांना योगाच्या माध्यमातून मानसिक स्वास्थ सुधारण्यास मदत करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे  रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी नागरिकाना मोफत औषधे दिली जाणार आहेत. तसेच झोपडपट्टी भागातही प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे औषध पोहचवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शुभा राऊळ यांनी दिली. जिल्हाधिकारी यांना त्यांच्या अधिकारात असलेल्या निधीचा वापर करून औषधे त्या त्या भागात पोहचवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

भारतात साडे सात लाख तर राज्यात ४५ हजार निमाचे डॉक्टर्स आहेत. टास्क फोर्समध्ये काम करताना स्थानिक पातळीवर काम करणं गरजेचे आहे. हे डॉक्टर्स अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत आयुषचे उपचार केले जाणार आहेत.

– डॉ संजय लोंढे, अध्यक्ष,  निमा संघटना

- Advertisement -

हे ही वाचा – अखेर दिल्ली सरकारची कबुली, कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -