घरट्रेंडिंगGo corona : खडू, वर्तुळाचे इंडियन मॉडेल

Go corona : खडू, वर्तुळाचे इंडियन मॉडेल

Subscribe

देशभरातील लॉकडाऊनंतर आता सोशल डिस्टन्सिंगच्या अतिशय भन्नाट कल्पना भारतीयांकडून राबविण्यात येत आहेत. करोना व्हायरसला आळा घालण्यासाठी पंजाबपासून ते तामिळनाडूपर्यंत लोकांनी अनेक नवनवीन संकल्पांचा वापर करून सोशल डिस्टन्सिंगची संकल्पना राबवली आहे. अगदी दूध डेअरीवर दूध देण्यापासून, किराणा मालाच्या खरेदीपासून ते शौचालयाच्या रांगेसाठी लोकांनी स्वतःच सोशल डिस्टन्सिंगचे अंतर आखून घेतले आहे. लोकांनी खडूचा वापर करून सोशल डिस्टन्सिंगसाठीचे अंतर एक वर्तुळ करून आखले आहे. एक स्वतःसाठीची लक्ष्मण रेषा या खडू आणि वर्तुळाच्या माध्यमातून आखण्यात आली आहे.

I just received these photographs. Wonderful discipline by the Punjabis. Stay at home and keep yourself safe. Administration & Police are working to ensure you all have access to essentials. #COVID2019 pic.twitter.com/x4mtUV0KSr

- Advertisement -

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंघ यांनी पंजाबी नागरिकांचे कौतुक करत लोकांच्या शिस्तीचे कौतुक केले आहे. घरीच रहा आणि स्वतःला सुरक्षित रहा. तुमच्या दैनंदिन गरजांपोटी आम्ही सर्व प्रकारची मदत देण्यासाठी तयारीत आहोत. त्यामुळे प्रशासन आणि पोलिस दोघांकडून तुम्हाला मदत करण्यात येईल असे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. नॉयडा, बंगळुरू, गुजरात याठिकाणच्या नागरिकांनीही स्वतःच्या सुरक्षेसाठी वर्तुळ आखत खडूचा वापर केला. अनेक ठिकाणी किराणा माल खरेदीसाठीही लोकांनी गर्दी केली होती. पण त्याठिकाणीही लोकांनी खडूने सर्कल करून सुरक्षित अशी स्वतःची व्यवस्था केली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकांनी लॉकडाऊनची शिस्त मोडल्यास त्यांना वर्तुळास बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -