घरदेश-विदेशभारतात करोनाचा पहिला बळी?

भारतात करोनाचा पहिला बळी?

Subscribe

मलेशियातून आलेल्या तरुणाचा कोचीत मृत्यू

चीन आणि जगभरात हजारोंच्या संख्येने बळी घेतलेल्या करोनाने भारतातही शिरकाव केला आहे. एका ३६ वर्षीय तरुणाला एर्नाकुलमच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तरुणामध्ये करोना विषाणूसारखी लक्षणे आढळली होती. शुक्रवारी रात्री या तरुणाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. या तरुणाचा मृत्यू नक्की करोना व्हायरसमुळे झाला आहे का, याचा तपास आता डॉक्टर्स करत आहेत.

या तरुणाच्या मृत्युबाबत केलेल्या तपासणीत त्याला तीव्र स्वरुपाचा न्यूमोनिया झाला होता असे स्पष्ट झाले आहे. तो डायबिटीक कीटोएसिडोसिसने देखील पीडित होता. हा आजार मधुमेहाच्या रुग्णांना होण्याचा संभव असतो आणि तो जीवघेणाही असतो. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचा मृत्यू तीव्र स्वरुपाचा न्यूमोनिया आणि श्वास यंत्रणा बंद पडल्याने झाला.

- Advertisement -

मृत पावलेला हा तरुण मलेशियावरून परतला होता. त्याची पहिली रक्त चाचणी केल्यानंतर त्याला करोनाची लागण झाली नसल्याचे सांगण्यात आले होते. तथापि, या तरुणाचा मृतदेह सध्या अलिप्त ठेवण्यात आला आहे. या तरुणाचा शुक्रवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमाराला मृत्यू झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, यावर कोणताही निर्णय दुसर्‍या सॅम्पल टेस्टनंतरच घेतला जाऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -