घरताज्या घडामोडीमोठी बातमी! दिवाळीनंतर एक लस घेतलेल्या नागरिकांनाही करता येणार लोकल प्रवास?...

मोठी बातमी! दिवाळीनंतर एक लस घेतलेल्या नागरिकांनाही करता येणार लोकल प्रवास? आरोग्यमंत्र्यांचे संकेत

Subscribe

सेतू अँपमध्ये सेफ असे स्टेटस असेल तर एक डोस घेतलेल्या नागरिकांच्या निर्बंधांच्या शिथिलतेवर विचार

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने राज्यातील अनेक ठिकाणी निर्बंधात शिथिलता देण्यात आली. लोकल तसेच मॉल्स आणि कॉलेजमध्ये कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच जाण्यास परवागनी देण्यात आली आहे मात्र दिवाळीनंतर राज्यात कोरोना विरोधी लसीचा केवळ एक डोस घेतलेल्या नागरिकांना देखील लोकल, मॉल्स,कॉलेज आणि इतर सार्वजनिक ठिकाणी जाण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. जालना येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल,मॉल्स यासारख्या ठिकाणी जाण्यास परवनागी नाही. परंतु कोरोना रुग्णांची संख्या जर आटोक्यात राहिली तर यासंदर्भात सवलत देण्याचा विचार केला जाऊ शकतो. सेतू अँपमध्ये सेफ असे स्टेटस असेल तर एक डोस घेतलेल्या नागरिकांच्या निर्बंधांच्या शिथिलतेवर विचार केला जाऊ शकतो. दिवाळी नंतर रुग्णसंख्येचा आढावा घेऊन दोन डोसची अट शिथिल करण्याचा राज्य सरकारचा विचार असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यातील मंदिरे घटस्थापनेच्या मुहूर्तावर दर्शनासाठी खुली करण्यात आली. त्याचप्रमाणे राज्यातील शाळा देतील सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर १८ वर्षाखालील लहान मुलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. शाळा महाविद्यालये सुरू होत असल्याचे त्यांच्या प्रवासात अडचणी निर्माण होत असल्याचे राज्य शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता रुग्णसंख्या बऱ्यापैकी आटोक्यात आलेली पहायला मिळत आहेत. राज्यातील मृत्यूदर देखील कमी झाला असून नव्या रुग्णांची संख्या कमी होत त्यामुळे दिवाळीपर्यंत राज्यातील ही परिस्थिती अशीच राहिली तर लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांना देखील  लोकल प्रवास,तसेच महाविद्यालये,मॉल्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणी जाण्यास परवनागी मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mega Block : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -