घर महाराष्ट्र इंडोनेशियाची लेक झाली भरडखोलची सून; पारंपरिक पद्धतीने विवाह करून स्वीकारली भारतीय संस्कृती

इंडोनेशियाची लेक झाली भरडखोलची सून; पारंपरिक पद्धतीने विवाह करून स्वीकारली भारतीय संस्कृती

Subscribe

श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल गावातील मुरलीधर लाया पाटील यांचा मुलगा भारत याने पारंपरिक भारतीय संस्कृतीने इंडोनेशिया येथील आय पुतूनुरा सांभा तबानन, बाली यांच्या कन्येजवळ भरडखोल येथील विठ्ठल मंदिरात विधिवत भारतीय कोळी समाज्याच्या पद्धतीने विवाह समारंभ पार पडला

श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल गावातील मुरलीधर लाया पाटील यांचा मुलगा भारत याने पारंपरिक भारतीय संस्कृतीने इंडोनेशिया येथील आय पुतूनुरा सांभा तबानन, बाली यांच्या कन्येजवळ भरडखोल येथील विठ्ठल मंदिरात विधिवत भारतीय कोळी समाज्याच्या पद्धतीने विवाह समारंभ पार पडला. (Indonesia s lake became the daughter in law of Bhardakhol Adopted Indian culture by getting married in traditional way)

बहुदा रायगड जिल्ह्यातील कोळी समाजातील एका मुलाचा हा पहिला परदेशातील मुलीबरोबरचा विवाह असेल.त्यामुळे या विवाह सोहळा  अनूभवायला परिसरातील लोकांची गर्दी लोटली होती.

- Advertisement -

भारत हा नोकरीच्या निमित्ताने बाहेर होता. उच्च शिक्षण घेऊन त्याने हाॅटेल मॅनेजमेंट करून तो नोकरीसाठी परदेशात गेला. हे दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते. तिनेही हाॅटेल मॅनेजमेंट केले आहे . तिथेच सांतानुदेवी बरोबर त्याची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनीही आपल्या प्रेमप्रकरणाबात आई वडीलांना सांगितलं. दोघांचाही हट्ट असल्याने नाईलाजास्तव आईवडिलांनी रितसर परवानगी दिली.

पारंपारिक पद्धतीने पार पडलेल्या या विवाहानंतर सांतानुदेवीला पत्रकाराने या लग्नाविषयी विचारले असता यापुढे मी भारतीय संस्कृती जतन करून इथले रितीरिवाज पुढे घेऊन जाईन असे  तिनं म्हटलं.

- Advertisement -

भारतने बारावीनंतर पुण्यामध्ये तीन वर्षांचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर भारतातच अनुभवासाठी तीन वर्षे एका हॉटेल मध्ये काम करून परदेशात मालदीव्स येथे पंच तारांकित हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिथेच दोन वर्षांपासून तो काम करत आहे. सांतानुदेवी इंडोनेशिया देशातील बाली या शहरातील असून तिनेही हॉटेल मॅनेजमेंट केले असून तीदेखील मालदीव्समध्ये पंच तरांकित हॉटेलमध्ये काम करत होती. दोघेही एकत्र काम करत असल्याने तिथेच ओळख झाली अन् ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

भारत म्हणतो की,आम्हा दोघांनाही वाटलं की, आम्ही एकमेकांना आता पूर्ण समजून घेऊ लागलो आहोत.  आता लग्न करायला हरकत नाही,  तेव्हा आम्ही आमच्या आई वडीलांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर दोघांच्याही आई वडीलांनी माहिती घेऊनच आमच्या विवाहाला रितसर परवानगी दिली. दोन्ही परिवाराकडून समाजाची सहमती घेऊन भरडखोल येथील विठ्ठल मंदिरात विधिवत विवाह समारंभ संपन्न झाला.

(हेही वाचा: ‘महानिर्मिती’ची वीजकेंद्रे व्हेंटिलेटरवर; केवळ चार-पाच दिवस पुरेल एवढाच कोळसा )

- Advertisment -