घरमहाराष्ट्रसम-विषम वक्तव्य प्रकरणी न्यायालयाचा इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा! 

सम-विषम वक्तव्य प्रकरणी न्यायालयाचा इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा! 

Subscribe

अंधश्रद्धा निर्मूलन समिती या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार आहे.

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. संगमनेर सत्र न्यायालयाने इंदोरीकर यांची या प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरु होती. अखेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समिती या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. ‘आमची लढाई कोणा व्यक्ती विरोधात नसून प्रवृत्ती विरोधात आहे. अशा प्रवृत्तीना वेळीच पायबंद घालायला हवा आणि म्हणूनच आम्ही या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार आहोत,’ असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे म्हणाल्या.

इंदोरीकर महाराज गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. पुत्र प्राप्तीसंदर्भात किर्तनात केलेल्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल केला होता. या विरोधात इंदोरीकर महाराजांनी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

- Advertisement -

इंदोरीकर यांचे वक्तव्य पीसीपीएनडीटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा असल्याची बाजू सरकार आणि अंनिसच्या वतीने मांडण्यात आली. मात्र, इंदोरीकर महाराज यांनी केलेले वक्तव्य कोणतीही जाहिरात नव्हती आणि त्या वक्तव्याला ग्रंथाचा आधार होता, हे ग्राह्य धरत कोर्टाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -