कोल्हापूर: वेळे अभावी इंदोरीकर महाराज यांचा कार्यक्रम रद्द

indorikar maharaj kolhapur programme cancel in shivaji university

कोल्हापुरातील इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. इंदोरीकर महाराजांना वेळेवर पोहचणे शक्य नसल्यामुळे हा कार्यक्रम रद्द केला जात असल्याचं सांगितलं जात आहे. कोणत्याही संघटनेच्या दबावाला आम्ही बळी पडलेलो नाही, असं कीर्तन महोत्सवाच्या आयोजकांनी स्पष्ट केलं आहे. जो पर्यंत वाद संपुष्टात येणार नव्हता तोपर्यंत इंदोरीकर महाराज इंदोरीवरून निघणार नव्हते. तसंच आता या कार्यक्रम स्थळी ते वेळेत पोहचणार नसल्याचं कारण देऊन आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द केल्याच जाहीर केलं आहे. मात्र तीन महिन्यांमध्ये इंदोरीकर महाराजांच कीर्तन ठेवणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले आयोजक?

आज काही संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केला. मात्र त्याला न जुमानता फक्त वेळे अभावी हा कार्यक्रम रद्द केला आहे. कारण महाराजांचा संध्याकाळी सात वाजता दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे आम्ही इंदोरीकर महाराजांचा फक्त कीर्तनाच कार्यक्रम स्थगित करतोय. पण येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये मी भव्यदिव्य असा हा कार्यक्रम करणार आहे, असं कीर्तन महोत्सवाचे संकल्पक, अध्यक्ष डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा – इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम उधळून लावू