मोबाईलच्या अतिवापरामुळे अल्पवयीन मुली पळून जातात; इंदुरीकर महाराजांचं अजब विधान

मोबाईलच्या अतिवापरामुळे अल्पवयीन मुली पळून जातात असं ते म्हणाले आहेत. मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

complaint file against indurikar maharaj
किर्तनकार इंदुरीकर महाराज

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांची अनेक वक्तव्ये वादाच्या भोवऱ्यात अडकली आहेत. नुकत्याच जळगाव शहरातील पिंपळा येथे केलेल्या किर्तनात त्यांनी मोबाईलच्या (Mobile) अतिवापरावर भाष्य केलं. मोबाईलच्या अतिवापरामुळे अल्पवयीन मुली पळून जातात असं ते म्हणाले आहेत. मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

इंदुरीकर महाराज म्हणाले की, मोबाीलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आजच्या महाविद्यालयीन तरुणांबरोबरच विद्यार्थीही मोबाईल व्यसनाच्या (Mobile Addiction) आहारी गेले आहेत. शाळकरी फेसबुक, इंस्टाग्राम सोशल मीडियासारखा माध्यमांचा वापर केला जात आहे. यासर्व गोष्टींचा परिणाम मुलांच्या संस्कारावर पडला असून त्यातून विपरीत घटना घडत आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे अल्पवयीन मुली पळून जातात.

हेही वाचा – इंदुरीकर महाराजांच्या लस न घेणाच्या वक्तव्यावर, राजेश टोपे म्हणतात

तरुण पिढी दारूच्या आहारी इतकी गेली आहे की त्यामुळे दारूचा खप वाढला. भविष्यात या तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळणार नाही, अशी मिश्लिक टिप्पणीही त्यांनी केली.

दरम्यान, याच किर्तनात त्यांनी शासकीय कार्यपद्धती, अधिकारी आणि त्यांच्या वेतनश्रेणीवरूनही भाष्य केले. ते म्हणाले की, ‘जे काम करत नाही त्यांचा पगार जास्त आणि जे काम करतात त्यांना पगार कमी आहे. विभागाने जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला कर्मचाऱ्यांची बुद्धी मोजली पाहिजे व त्यानुसार पगार ठरवला पाहिजे.