Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र उद्योगपती गौतम अदानींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, मातोश्रीवर तासभर खलबतं

उद्योगपती गौतम अदानींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, मातोश्रीवर तासभर खलबतं

Subscribe

केंद्र आणि राज्य सरकारमुळे महाराष्ट्रात येणारे उद्योग आणि रोजगार दुसऱ्या राज्यात जात असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. असं असताना गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई- राज्यातील उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात जातात, राज्यातील रोजगार दुसऱ्या राज्यात जातात असा आरोप शिवसेनेकडून केला जात असतानाच उद्धव ठाकरेंनी आज प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घेतली. मातोश्रीवर आज तब्बल तासभर यांच्यात चर्चा झाली. कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत मात्र कोणतीही मात्र समजू शकलेली नाही.

हेही वाचा – शिवसेनेच्या मेळाव्यात संजय राऊत? व्यासपीठावर खुर्ची ठेवली राखीव

- Advertisement -

गौतम अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मानले जातात. व्यापार-उद्योग आणि रोजगारीवरून सध्या राज्यात विरोधकांकडून घमासान सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारमुळे महाराष्ट्रात येणारे उद्योग आणि रोजगार दुसऱ्या राज्यात जात असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. असं असताना गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – देशाचे कृषीमंत्री म्हाडाच्या बैठकीत कशासाठी? भाजपाचा पवारांना सवाल

- Advertisement -

दरम्यान, थोड्याच वेळात उद्घव ठाकरे आज नेस्को येथील मैदानावर शिवसैनिकांना संबोधणार आहेत. आज गटनेत्यांचा मेळावा असून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहेत. किशोरी पेडणेकर, भास्कर जाधव आणि अरविंद सावंतसह अनेक नेत्यांनी नेस्कोच्या व्यासपीठावरून शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं असून आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरेही मार्गदर्शन कऱणार आहेत. यावेळी ते गौतम अदानींच्या भेटीविषयी काही माहिती देतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आदित्य ठाकरेंचा आरोप काय?

आपल्या राज्यात प्रत्येक ठिकाणाहून लोक येत असतात. नोकरीनिमित्त देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील तरुण मंडळी मुंबईत येतात. वर्सोवा वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी कंत्राटदार बदलला गेला. मात्र, या प्रकल्पात काम करण्यासाठी चेन्नईत मुलाखती घेण्यात येत आहे. मुंबईत काम करण्यासाठी चेन्नईत मुलाखती का? असा सवाल युवानेते आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंनी सरकारवर आगपाखड केली. यावेळी कंत्राटदार कंपनीने प्रसिद्ध केलेली जाहिरातही आदित्य ठाकरे यांनी भर पत्रकार परिषदेत सादर केली. या जाहिरातीत मुलाखत चेन्नईत होत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -