घरCORONA UPDATEराज्यात उद्योग चक्र सुरू; २५ हजार कंपन्यांमधून उत्पादनाला सुरुवात

राज्यात उद्योग चक्र सुरू; २५ हजार कंपन्यांमधून उत्पादनाला सुरुवात

Subscribe

रेड झोन क्षेत्रातील कंपन्या वगळता राज्यातील २५  हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर राज्यात उद्योगाचे चक्र सुरू झाले आहे. रेड झोन क्षेत्रातील कंपन्या वगळता राज्यातील २५  हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. कोरोनामुळे ठप्प झालेल्या उद्योग व्यवसायाला गती देण्यासाठी सरकारने ५७ हजार ७४५ उद्योगांना परवाने दिले असून २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ९ हजार १४७ कारखान्यांना परवाने दिले आहेत. त्यापैकी ५७७४ कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी दिली.

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रीकल्चरच्यावतीने आयोजित वेबिनारमध्ये बोलताता सुभाष देसाई यांनी लघु उद्योगांसाठी केंद्र सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याचीही माहिती दिली. मुंबई, ठाणे, पुणे,पिंपरी चिंचवड हा भाग रेड झोनमध्ये आहे. येथील उद्योग सुरू करण्याची मागणी होत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी मे अखेर महाराष्ट्र ग्रीन झोन करायचा संकल्प केला आहे. त्यामुळे तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन देसाई यांनी केले.

- Advertisement -

 वीज बिलात सवलत

स्थिर वीज बिलाबाबत उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेतली असून जेवढा विजेचा वापर होईल, तेवढेच बिल आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीदेखील सवलती जाहीर केल्या आहेत, असे देसाई यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -