घरक्राइमअकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार; रुपाली चाकणकर आणि सुषमा अंधारेची तीव्र प्रतिक्रिया

अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार; रुपाली चाकणकर आणि सुषमा अंधारेची तीव्र प्रतिक्रिया

Subscribe

अकोला: अकोल्यात माणूसला काळिमा फासणार घटना घडली आहे. गावगुंडाने अल्पवयीन मुलीवर अमानवीय अत्याचार केले आहे. या मुलीवर गावगुंडाने सिगरेटचे चटके देत, मुंडन करून मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कायदाय घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी गणेश कुमरेला पोलिसांनी अटक केले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेत आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल.

या घटनेवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया देत म्हणाल्या , राज्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा कारभार काय गलथान पद्धतीने सुरू आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील आरोप गणेश कुमरेसंदर्भात मुलींच्या आईने खदान पोलिसांना दोन वेळा माहिती दिली होती. पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोपी निर्ढावलेला होता. त्यामुळे हे जास्त चिंताजनक आहे. पोलिसांना तक्रार देऊनही अशा घटना घडत आहेत आणि त्याकडे पोलीस लक्ष देत नाहीत म्हणजे नेमके काय?असा सवाल उपस्थित करत सुषमा अंधारेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

या घटनेवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या, “अकोल्यातील घटना ही निंदनीय आहे. या प्रकरणी आरोपीवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. या आरोपीला कायद्याच्या चौकटीतून शिक्षा होईलच. अशा घटना होऊन नये म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात जन सुनावणीच्या माध्यमातून आढावा घेत असतो. गेल्या महिन्याभरापूर्वी मी अकोल्यात असताना बीट मार्शल, दामिनी पथक आणि निर्भया पथक पाहणी करत असताना त्यांना सुचना दिल्या होत्या. खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून सुद्धा आरोपीवर कारवाई झाली नसेल, पीडितेच्या कुटुंबियांनी मागणी करूनही दुर्लक्ष केले असेल तर त्याची चौकशी राज्य महिला आयोगाच्या वतीने करण्यात येईल.

हेही वाचा – कुर्ल्यात सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह; मुंबई महिलांसाठी सुरक्षित की असुरक्षित?

- Advertisement -

राज्याच्या गावातील अशा घटना रोखण्यासाठी काय तातडीच्या उपोयोजना केल्या जाणार आहेत, या प्रश्नावर रुपाली चाकणकर म्हणाल्या,”शाळा आणि कॉलेजच्या मुलींसाठी 1098 आणि 1091 या टोल फ्री क्रमांकाची उपलब्धता करून दिली आहे. महिलांना तात्काळ मदतीसाठी या टोल फ्री देण्यात आलेले आहे.”

हेही वाचा – या अश्रूंची कधीतरी फुले होतील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून रोहित शर्माला प्रोत्साहन

टोल नंबर उचलत नाहीत; सुषमा अंधारेंचा आरोप

राज्याच्या गावातील अशा घटना रोखण्यासाठी काय तातडीच्या उपोयोजना केल्या जाव्यात, या प्रश्नावर सुषमा अंधारे म्हणाल्या, दीड ते दोन महिन्यापूर्वी कल्याणमध्ये अल्पवीय मुलगी आईसोबत शिकवणीवरून परत येत असताना. मुलीला आरोपींने चाकूचे वार करतो. मग आकरा वर्षाच्या मुलीने कोणत्या आत्यविश्वासाने वावरायचे, असा उलट सवाल सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकर यांना केला आहे. सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, ज्या टोल नंबरच्या आपल्याकडे बाता मारल्या जातात. पण हे टोल नंबर उचलत नाहीत. टोल नंबरचे फोन न उचल्यासाठीच असतात. हे राज्यात सर्वांना माहित झालेले आहे. कधी फोन लागला तर तो बाजूला ठेवून दिला जातो आणि त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. कल्याणची घटना ही राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.”

हेही वाचा – आरक्षणाच्या नावावर नुरा कुस्ती कशासाठी चालू आहे? सुषमा अंधारेंचा भुजबळांना थेट सवाल

गृहमंत्र्यांचे याकडे लक्ष नाही

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “शाळा आणि कॉलेज परिसरात पानाचे ठेले असून नये. तिथे नाक्या नाक्यावर मुले थांबतील अशा जागा असून नये आणि याठिकाणी पूर्णवेळेसाठीचा बंदोबस्त देता येईल का? मुलगीने पालकांना सांगितल्यानंतर पोलिसात माहिती देतात. तेव्हा पोलीस गणेश कुमरे सारख्या गुंडांना अभय का देतात? या आरोपींचा गांजा विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपीचा गांजा विक्रीचा धंदा कोणाच्या आशीर्वादाने चालतो. राज्याच्या गृहमंत्र्यांचे याकडे लक्ष नाहीये का? यासारखे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित गृहमंत्र्यांना केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -