घरताज्या घडामोडीऑपरेशन नमस्ते !

ऑपरेशन नमस्ते !

Subscribe

करोनाच्या संकटाशी लढण्यासाठी आता भारतीय लष्कराने ऑपरेशन नमस्तेची घोषणा केली आहे. देशभरात लॉकडाऊनच्या स्थितीत लोकांना होम क्वारंटाईनसाठी विविध सुविधा देण्यासाठी लष्कराची मदत घेण्यात येणार आहे. संपुर्ण देशभरात आठ ठिकाणी क्वारंटाईनसाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही भारतीय लष्करामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतीय लष्कराने याआधीही अशा पद्धतीचे ऑपरेशन राबवले आहे. त्यामध्ये अगदी य़शस्वीरीत्या लष्कराने आपआपली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. आमचे सैन्य करोनाचा मुकाबला करण्यासाठी आता सज्ज आहे असे लष्करप्रमुख एम एम नरवणे यांनी स्पष्ट केले आहे. कोव्हिड १९ च्या विरोधातील लढाईला भारतीय लष्कराने ऑपरेशन नमस्ते असे नाव दिले आहे. या ऑपरेशनअंतर्गत करोना संशयितांसाठी क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करून देणे मुख्य उदिष्ट असणार आहे. लष्करातील जवानांनी आपल्या कुटुंबीयांची काळजी करण्याची गरज नाही. या काळात जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात येणार आहेत. याआधीही अशा स्थितीत लष्कराने यशस्वीपणे ऑपरेशन पराक्रम पार पाडले आहे. मला विश्वास आहे की यावेळीही ऑपरेशन नमस्ते यशस्वीपणे पार पडेल असे नरवणे यांनी सांगितले.

- Advertisement -

ऑपरेशन नमस्तेचा भाग म्हणून लष्कराकडून कमांडनुसार हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात येतील. लष्कराच्या कुटुंबीयांना जवानांना भेटण्यासाठीची सुविधाही या काळात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लष्कराने गेल्या काही दिवसात दोन ते तीन सूचना जाहीर केल्या आहेत. टॅक्टीकल ऑपरेशनमुळे जवानांना सोशल डिस्टन्सिंग ठेवणे शक्य होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -