घरमनोरंजनरितेश - जेनेलिया यांच्या लातूर एमआयडीसी भूखंड प्रकरणी चौकशीला सुरुवात; उदय सामंतांची...

रितेश – जेनेलिया यांच्या लातूर एमआयडीसी भूखंड प्रकरणी चौकशीला सुरुवात; उदय सामंतांची माहिती

Subscribe

लातूर एमआयडीसीमध्ये रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्या देश अॅग्रो प्रा. लि. कंपनीला केवळ एका महिन्यात 120 कोटी रुपयांचं कर्ज कसं मंजूर करण्यात आलं असा आरोप स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता.

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्या मालकीच्या कंपनीला लातूर येथे जो भूखंड देण्यात आला त्याचीच चौकशी सुरु आहे. अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. दरम्यान एमआयडीसीचे सीईओ बीपीन शर्मा या प्रकरणाची चौकशी करत आहेत. लातूर एमआयडीसीमध्ये रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्या देश अॅग्रो प्रा. लि. कंपनीला केवळ एका महिन्यात 120 कोटी रुपयांचं कर्ज कसं मंजूर करण्यात आलं असा आरोप स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. ( Inquiry begins in Ritesh-Genelia’s Latur MIDC plot case; Information about Uday Samantha )

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या मालकीच्या असलेल्या देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आलेल्या भूखंडाची चौकशी एमआयडीसी सचिवांकडून सुरू असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

- Advertisement -

रितेश आणि जेनेलिया यांच्यावर नेमका आरोप काय?

लातूर एमआयडीसी भागात 2019 सालापासून भूखंडासाठी 16 उद्योजकांची नावे प्रतीक्षा यादी असताना त्यांना डावलण्यात आले आणि रितेश-जिनेलिया यांच्या देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला तो भूखंड देण्यात आला. दरम्यान हा भूखंड फक्त एकाच महिन्यात रितेश आणि जेनेलिया यांना देण्यात आला. तसेच या कंपनीला महिन्याभरातच 120 कोटी रुपयांचं कर्जसुद्धा मंजूर करण्यात आले. असा आरोप लातूरच्या भाजप जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन केला.

- Advertisement -

दरम्यान या सगळ्या प्रकरणी लातूर देश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे आस्थापना व्यवस्थापक दिनेश केसरी ‘संबंधित वृत्त हे चुकीच्या माहितीच्या आधारे आहे असे म्हणत खुलासाही पाठवला आहे.


हे ही वाचा – धर्माच्या नावावर आपण कोठे पोहोचलो आहोत? ‘हेट स्पीच’बद्दल सुप्रीम कोर्टाला चिंता

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -