घरताज्या घडामोडीINS vela : भारतीय बनावटीची पाणबुडी करणार शत्रूवर हल्लाबोल, INS vela ची...

INS vela : भारतीय बनावटीची पाणबुडी करणार शत्रूवर हल्लाबोल, INS vela ची वैशिष्ट्ये काय ?

Subscribe

भारतीय नौदलाने एका ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे की, येत्या २५ नोव्हेंबर रोजी INS वेला भारतीय नौसेनेच्या ताफ्यात सामील होणार याबाबतची. भारतीय नौदलाने या प्रयत्नाला आत्मनिर्भर भारताचे उदाहरण म्हटले आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) च्या माध्यमातून ही आयएनएस वेला ही पाणबुडी तयार करण्यात आली आहे. अतिशय अत्याधुनिक पद्धतीची ही नौदलाची नवीन पाणबुडी आहे. महत्वाचे म्हणजे पाण्याच्या आतून आणि पाण्याबाहेरूनही शत्रूवर हल्लाबोल करण्याची या पाणबुडीची वैशिष्ट्ये आहेत. (INS vela submarine set to commission as part of indian navy under project 95 )

#Vela – A Testimony to #AatmaNirbharBharat, Cutting Edge Technology & Dedicated #Teamwork.

- Advertisement -

Fourth of the Project 75 Submarine built by #MazagonDockLimited is all set to be Commissioned into #IndianNavy on #25Nov 21.@DefenceMinIndia @SpokespersonMoD @PIB_India @PBNS_India pic.twitter.com/XGehqXG6yE

— SpokespersonNavy (@indiannavy) November 24, 2021

- Advertisement -

स्कॉर्पीन श्रेणीतील आयएनएस वेला ही देशातील चौथी पाणबुडी आहे. जवळपास दोन वर्षे या पाणबुडीचे ट्रायल्स चालले. त्यानंतर आता २५ नोव्हेंबरला या पाणबुडीला भारतीय वायुसेनेत दाखल केले जात आहे. भारतात पहिल्यांदा मे २०१९ रोजी या पाणबुडीची चाचणी करण्यात आली होती. जेव्हा शत्रूशी कडवी झुंज देण्याची गोष्ट येते तेव्हा INS वेलाच्याच्या अत्याधुनिक आणि लढवय्या अशा क्षमतांची ओळख होते. डीझल इलेक्ट्रिक अशा स्वरूपाची पाणबुडी ही माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडद्वारे प्रोजेक्ट ७५ अंतर्गत विकसित करण्यात आली आहे.

काय आहेत INS वेलाची वैशिष्ट्ये ?

स्कॉर्पीन श्रेणीतील पाणबुडी ही एंटी सरफेस वॉर, एंटी सबमरीन वॉर, गुप्त माहिती गोळा करण्यासाठी, माइन प्लॉट करण्यासाठी, निरीक्षणासारख्या अनेक मिशनसाठी ही पाणबुडी अतिशय उपयुक्त आहे. या पाणबुडीला अल्ट्रामॉर्डन तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आले आहे. या पाणबुडीअंतर्गत अतिशय विशिष्ट पद्धतीने युद्धासाठी शस्त्र वापरण्याची किमया ही पाणबुडीचे वैशिष्ट्य आणखी वाढवते. या पाणबुडीत टॉप सायलेंसिंग टेक्निक, लो रेडिएटेड नॉइज लेव्हल, हाइड्रो हायनामिक शेप ही पाणबुडीची वैशिष्ट्ये आहेत. तसेच शत्रुविरोधात शस्त्रांचा वापर करण्यासाठी अतिषय उपयुक्त अशी पाणबुडी आहे. एकाचवेळी पाण्याच्या आत आणि बाहेरही एकाचवेळी टॉरपीडोसोबतच ट्यूबच्या माध्यमातून लॉंच एंटी शिप मिसाइलचा वापर करून हल्ला करणे शक्य आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -