Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'माझी बहीण वाघीण' पुजाच्या बहिणीची भावनिक पोस्ट

‘माझी बहीण वाघीण’ पुजाच्या बहिणीची भावनिक पोस्ट

Related Story

- Advertisement -

मुळ बीडची असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या पुणे य़ेथील आत्महत्या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे पुजा चव्हाणच्या आत्महत्येमुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. त्याचबरोबर पूजेच्या हत्येचा संबंध महाविकास आघाडीतील एका मंत्र्यासोबत असल्याच्या ११ ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. याच आता बहिण दिया चव्हाण ( (Instagram post of Dia Chavan ) हीने पुजाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे सरसावली आहे. दियाने सोशल मीडियावर पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणात तर्क लढवणाऱ्यांविरोधात आवाज उठवला आहे. दियाने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये तिने माझी बहीण वाघिण होती. ती असं करुचं शकत नाही. आणि जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला त्यामागे कुठलं तरी मोठ कारण असेल असं तिने लिहिले आहे. (Instagram post of Dia Chavan, sister of Pooja Chavan who committed suicide)

 

View this post on Instagram

 

A post shared by Diya Chavan (@the_diya_chavan1)


यावर तिने स्पष्टपणे लिहिले आहे की, २ दिवसांपासून मी पाहात आहे की तुम्ही काही ही पोस्ट टाकत आहात. काही विचारपूस न करता, ती फक्त परळी वैजनाथची नाहीतर पूर्ण महाराष्ट्राची वाघिण होती माझी बहीण. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की कसं काही करेल आणि हे तुम्हालापण चांगलंपणे माहिती आहे. मला आजसुद्धा विश्वास होत नाही तिने सुसाईड केलं आहे आणि जरी केलं असेल तर मोठीच कोणती तरी गोष्ट असेन. दीदीने नेहमी सर्वांना मदत केली आहे. काही विचार न करता तिने फक्त बंजारा समाज नाहीतर सर्वांना पाठिंबा दिला आहे. जेवढं होईल तेवढं तिने मदत केली आहे. मी तिची लहान बहीण आहे हे माझं नशीब आहे. ती आज आपल्या सोबत नाही याचं जर तुम्हाला एवढं दु:ख होत असेल, तर विचार करा आम्ही कसा स्वत:ला सांभाळत आहोत. मला आधीच याचा त्रास सहन होत नाही. मम्मी पप्पाला सांभाळायचं आहे अजून. आणि तुम्ही अशा पोस्ट टाकत आहात. निदान तिला जस्टिस मिळू शकत नाही तर अशा पोस्ट करुन आम्हाला त्रास तर देऊ नका. तिला स्वर्गामध्ये शांतीने राहू द्या , ती जर हे सर्व पाहात असेल तर तिला किती त्रास होत असेल विचार करा. अशी भली मोठी पोस्ट दियाने लिहिली आहे.


- Advertisement -

हेही वाचा- पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी ऑडिओची सखोल चौकशी करा – फडणवीस


 

- Advertisement -