महाराष्ट्रात आजपासून रात्री 12 पर्यंत लाऊडस्पिकर लावण्यास परवानगी; तरुणाईमध्ये आनंदाचं वातावरण

त्यामुळे आजपासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाउडस्पिकर किंवा डीजे वाचविण्यासाठी सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना नवरात्रीत रात्री उशिरा पर्यंत गरबा खेळता येणार आहे.

garaba

मागील दोन वर्षांपासून कोव्हीडच्या संकटामुळे कोणतेच सण उत्सव साजरे झाले नव्हते. प्रत्येक सण साजरे करण्यावर निर्बंध होते. त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पिकर(loudspeaker)वाजविण्यावरसुद्धा निर्बंध होते. पण आता हे निर्बंध हटविण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस (shinde – fadanvis) सरकारने घेतला आहे. त्यामुळे आजपासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर किंवा डीजे वाचविण्यासाठी सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना नवरात्रीत रात्री उशिरा पर्यंत गरबा खेळता येणार आहे.

दरम्यान सर्व सण आणि उत्सवांवरचे निर्बंध हटविल्यानंतर दहीहंडी आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याची वेळी रात्री 10 पर्यंत लाऊडस्पिकर(loudspeaker) वाजविण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. पण आता संपूर्ण महाराष्ट्रातंच रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर लावण्यासाठी परवानगी घेण्यात आली आहे. त्यामुळेच आता नवरात्री (navratri) सोबतच येणाऱ्या उत्सवांमध्येही रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर लावल्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान राज्यातील मुंबई(mumbai), पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद यांसह अनेक शहरांमध्ये गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणूका उशिरा पर्यंत सुरु असतात. अशातच येणाऱ्या काळात निर्बंधमुक्त आणि नियममुक्त लाऊडस्पिकर लावता येणार आहे. मागील काही दिवसांपासून लाऊडस्पिकर उशिरापर्यंत लावण्यासाठी देण्यात येणाऱ्या पर्वांगीवरून वादंग सुद्धा निर्माण झाला पण आता शिंदे – फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे तरुणाईमध्ये मात्र आनंदचं वातावरण आहे.


हे ही वाचा – प्राध्यापकांच्या वेतनावरून चंद्रकांत पाटलांवर सुप्रिया सुळे संतप्त, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नसल्याचे सुनावले