घरताज्या घडामोडीजखमींना मदतीऐवजी नागरिकांनी पळवली साखर

जखमींना मदतीऐवजी नागरिकांनी पळवली साखर

Subscribe

पेठरोडवरील भीषण अपघातात पाच जण जखमी

पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीनजिक मध्यरात्रीच्या सुमारास दोन ट्रकमध्ये समोरासमोर भीषण अपघात होउन चार ते पाच जण जखमी झाले. जखमींना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आजे असून यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. मालट्रक आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक झाली. मालट्रकमध्ये साखर तर आयशरमध्ये मीठ भरले होते. अपघातानंतर रस्त्याच्या मध्यभागी वाहने पलटी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या मार्गावर अपघाताच्या घटना नित्याच्याच असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. दिंडोरी रोडवरील तारवालानगर वरून वेगाने येणारी अवजड वाहतूक आणि वारंवार बंद ठेवण्यात येत असलेले सिग्नल यामुळे या चौकात अपघाताचे अनेक घटना येथे घडतच असतात, पण हा अपघात या चौकातील आज पर्यंतचा भीषण अपघात आहे. मागील आठ महिन्यापासून या चौकातील सिग्नल बंद होता. काही दिवसांपूर्वी येथील वाहतूक सिग्नल चालू झाला पण यातील चार मधून फक्त तीनच सिग्नल चालू होते. येथील स्थानिक लोकं आणि व्यापारी वर्गाने वारंवार या चौकातील सिग्नल, गतिरोधक बसवण्याची अनेक वेळा मागणी केली आहे. हा चौक तारवालानगर चौक पेक्षाही धोकेदायक झाला असल्याने येथील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी मनविसेचे शहर सरचिटणीस धनराज रणदिवे यांनी केली आहे.

रहीवाश्यांनी साखर लुटली
अपघातग्रस्त एका ट्रकमध्ये साखर भरली होती. ट्रक ओव्हरलोड असल्याने अपघातानंतर ट्रक बाजूला असलेल्या दुभाजकावर जाउन पलटी झाला. त्यामुळे यातील साखरेचे पोते रस्त्यावर पडले. यावेळी पेठरोडवरील अंबिकानगर झोपडपटटीतील रहिवाशांनी ट्रकमधील साखर नेण्यासाठी पिशव्या घेउन गर्दी केली. पिशव्या भरून भरून येथील नागरिकांनी साखर घरी नेली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -