घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री सौर वाहिणी कृषी कार्यक्रमाला गती देण्याचे उपमुख्यमंत्र्यांकडून निर्देश

मुख्यमंत्री सौर वाहिणी कृषी कार्यक्रमाला गती देण्याचे उपमुख्यमंत्र्यांकडून निर्देश

Subscribe

सोलापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे आज उद्घाटन केले. यानंतर त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर वाहिणी कृषी कार्यक्रमाला गती देण्याचे निर्देश दिले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन केले. पण खरं म्हणजे हे खूप आधी व्हायला पाहिजे होते, तरीही आज झाले याचा आनंद आहे. याठिकाणी 75 टक्के सरकारी कार्यालये शिफ्ट झाले आहेत आणि 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडते आहे. त्यामुळे मी महसुल मंत्री अनासे जे इथले पालकमंत्री आहेत त्यांना या इमारतीवर बांधकाम करून सर्व कार्यालय याठिकाणी एकत्र येतील अशा प्रकारचे प्रयत्न करण्यास सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. (Instructions from the Deputy Chief Minister to speed up the Chief Minister’s solar channel agriculture program)

- Advertisement -

मुख्यमंत्री सौर वाहिणी कृषी कार्यक्रमाला गती देणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आढावा बैठकीत शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर वाहिणी कृषी कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे. त्यासंदर्भात गती देण्याचे निर्देश मी दिलेले आहेत. याकरता सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध करून देऊन तिथे सौर प्रकल्प उभारण्याचा आमचा मानस आहे. याशिवाय जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना असेल या सगळ्या योजनांचा आढावा घेतला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

198 कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहचले आहेत
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस किंवा वेगवेगळी मदत देण्याकरता राज्य सरकारच्या वतीने जवळपास 472 कोटी रुपयांची मदत आम्ही दिलेली आहे. गेल्या दोन महिन्यातली थोडीशी मदत बाकी आहे, पण ती फार कमी आहे आणि ती पुढील 15 दिवसांमध्ये वितरीत करू. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचली की नाही याचा आढावा घेतला तर ती जवळपास 198 कोटी रुपये जे मागील अवकाळीचे होते, ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचले आहेत. 50 हजार रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले आहेत. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कसं भलं करता येईल हा प्रयत्न आम्ही केलेला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -