घरताज्या घडामोडीपाट्या टाकण्याचे काम करू नका; रवींद्र चव्हाणांच्या अभियंत्यांना कानपिचक्या

पाट्या टाकण्याचे काम करू नका; रवींद्र चव्हाणांच्या अभियंत्यांना कानपिचक्या

Subscribe

एखादा अभियंता हा त्याच्या मर्जीने नव्हे तर गुणवत्तेवर खुर्चीवर बसला पाहिजे. जो स्पर्धा टाळतो तो मागे राहतो आणि जो चुकीच्या मार्गाने येतो तो पुढे जातो. या स्पर्धेत मी जोपर्यंत मंत्रिपदावर आहे तोपर्यंत मी तुमच्या सोबत नाही, असेही चव्हाण यांनी अभियंत्यांना सुनावले.

खुर्ची मिळविण्यासाठी मला आमिष दाखवू नका. मला कोणतीही लालसा नाही. त्यापेक्षा तुम्ही बदल घडवा, विभागाचा कारभार पारदर्शी करा. आपल्या कामात पारदर्शकता आणताना चांगल्या विभागात जाण्याची स्पर्धा संपवा, स्पर्धा नाही असे जेव्हा वाटू लागेल तेव्हा जे अपेक्षित आहे ते साध्य होईल, अशा कानपिचक्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी आपल्या विभागातील अभियंता अधिकाऱ्यांना दिल्या. (Instructions to Engineers by Public Works Minister Ravindra Chavan)

एखादा अभियंता हा त्याच्या मर्जीने नव्हे तर गुणवत्तेवर खुर्चीवर बसला पाहिजे. जो स्पर्धा टाळतो तो मागे राहतो आणि जो चुकीच्या मार्गाने येतो तो पुढे जातो. या स्पर्धेत मी जोपर्यंत मंत्रिपदावर आहे तोपर्यंत मी तुमच्या सोबत नाही, असेही चव्हाण यांनी अभियंत्यांना सुनावले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी थोडी लाज बाळगा एकदम निर्लज्ज बनू नका, अशा शब्दात अभियंत्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने आज सार्वजनिक बांधकाम विभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन २०१४-१५ ते २०१८-१९ अशा पाच वर्षातील पुरस्कारांचे रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी बोलताना चव्हाण यांनी विभागाच्या डागाळलेल्या प्रतिमेबद्दल आणि भ्रष्ट कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

सार्वजनिक बांधकाम विभागात मलईदार जागेसाठी चांगलीच चुरस असते. त्याचा संदर्भ घेत चव्हाण यांनी चांगल्या ठिकाणी जाण्याची स्पर्धा करू नका, असा सल्ला अभियंत्यांना दिला. स्पर्धा कामाची किंवा एखाद्या मागास भागात जाऊन काम करण्याची असली पाहिजे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा विभागावरील विश्वास उडाला आहे. आपण चुकत असल्यामुळे रस्त्यावर खड्डा पडून त्यात नागरिकांचा जीव जातो. आपणच आपल्यावर टीका करण्यासाठी लोकांना भाग पाडतो. हे ळण्यासाठी आपल्या कामात बदल करा. कामासाठी नव्या तंत्रज्ञानाची मदत घ्या. आपल्याला तुटपुंज्या निधीत खाते चालवायचे आहे. काटकसर करून पैसे वाचवायचे आहेत. त्यामुळे मिशन मोडवर काम करा. धूळ, फायली, पैसे, डर्टी गेम यामुळे डागाळलेली विभागाची प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना रवींद्र चव्हाण यांनी केल्या.

- Advertisement -

चुकीचे काम करू नका. विधिमंडळ अधिवेशनात आपल्या विभागाच्या मंत्र्याला प्रश्न विचारला जाणार नाही याची काळजी घ्या. चुकीचे काम झाले तर विधिमंडळात प्रश्न येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य करायचे आहे. आपल्या नेत्यांची इच्छाशक्ती लक्षात घेऊन अभियंत्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

नव्या संकल्पना घेऊन या : सौनिक

काम करताना अभियंत्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असा सल्ला सौनिक यांनी यावेळी दिला. बदलीसाठी माझ्याकडे फाईल घेऊन येता तसे नव्या संकल्पनांचे प्रस्ताव घेऊन या, अशी सूचनाही त्यांनी केली.

यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सतीश साळुंखे, सचिव (इमारती) प्रशांत नवघरे, मुंबई प्रदेश प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे सचिव सुनील वांढेकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव खं.तु.पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे रणजीत हांडे, अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी, कार्यकारी अभियंता चंद्रशेखर नाईक आदी उपस्थित होते.


हेही वाचा – चिंताजनक : राज्यात पुन्हा संख्या वाढली, 24 तासांत 755 कोरोना बाधितांची नोंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -