घरताज्या घडामोडीअनेक छोट्या बचत योजनांच्या व्याज दरात कपात

अनेक छोट्या बचत योजनांच्या व्याज दरात कपात

Subscribe

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) च्या व्याजदरामध्ये ०.८० टक्क्यांनी मोठी घट झाली आहे. म्हणजे एप्रिल ते जून या तिमाहीत पीपीएफला ७.१ टक्के व्याज मिळेल.

केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत पीपीएफ आणि केव्हीपी सारख्या अनेक छोट्या बचत योजनाचा व्याज दर ०.७० टक्क्यांवरून १.४० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) च्या व्याजदरामध्ये ०.८० टक्क्यांनी मोठी घट झाली आहे. म्हणजे एप्रिल ते जून या तिमाहीत पीपीएफला ७.१ टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर किसान विकास पत्रावरील व्याजदर ०.७० टक्क्यांनी कमी करून ६.९ टक्क्यांपर्यंत करण्यात आले आहे. बऱ्याच काळापासून अशी शक्यता वर्तवली जात होती की, सरकार लहान बचत योजनांवरील व्याज दर कमी करू शकते.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) व्याज दरामध्ये १.१० टक्के कपात करण्यात आली आहे. आता या योजनेतील गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना ६.८ टक्के दराने व्याज मिळेल. पाच वर्षांच्या आवर्ती ठेवींवरील (आरडी) व्याजदरामध्ये सर्वाधिक कपात १.४० टक्के आहे. आता आरडीला या कालावधीसाठी ५.८ टक्के दराने व्याज मिळेल. त्याचबरोबर पाच वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर ६.७ टक्के व्याज दिले जाईल. या योजनेत व्याजदरात एक टक्का कपात करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) वरील व्याजदरात १.२ टक्के कपात केली आहे. आता या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२० या कालावधीत ८.६ टक्क्यांऐवजी ७.४ टक्के दराने व्याज मिळेल.

- Advertisement -

या बचत योजनांवर सरकार दर तिमाहीवर व्याज दर ठरवले. केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याजदर सुमारे एक वर्षानंतर कमी केला आहे. सुकन्या समृद्धी खाते योजनेवरील व्याजदरही ०.८० टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत आता व्याजदर ८.४ टक्क्यांऐवजी ७.६ टक्के राहतील. दुसरीकडे, मासिक उत्पन्न खाते (एमआयए) ७.६ टक्क्यांऐवजी ६.६ टक्के दराने व्याज मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -