Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी ऑक्टोबरपासून प्रवेश

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी ऑक्टोबरपासून प्रवेश

Related Story

- Advertisement -

देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून  रोवली जात असून या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी येत्या ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबतचे नियोजन करण्यात  आल्याची माहिती  क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी शनिवारी दिली. तर विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक पदांची भरती प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीबाबत आवश्यक बाबींची पूर्तता करावी, अशी सूचना खासदार शरद पवार यांनी केली आहे.

राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याच्या अनुषंगाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे  शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी बोलताना पवार यांनी, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक आदी महत्त्वपूर्ण जागा भरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय प्रकिया तातडीने पूर्ण करावी, असे सांगितले. त्याचबरोबर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करावी, असेही पवार म्हणाले.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून चांगले प्रशिक्षक तयार होतील. राज्यातून चांगले खेळाडू तयार होतील,असा विश्वास व्यक्त करत  सुनील केदार यांनी कुलगुरू आणि प्राध्यापकांची निवड तातडीने करून प्रवेश प्रक्रियेला वेग द्यावा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, क्रीडा विद्यापिठाने ‘ऑन फिल्ड’  आणि ‘ऑफ फिल्ड’वर काम करून प्रशिक्षणावर अधिक भर द्यावा. तसेच चांगले प्रशिक्षक तयार करून त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील असे नियोजन करणे आवश्यक आहे. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण या विद्यापिठाच्या माध्यमातून येथे उपलब्ध होईल. या विद्यापिठांतर्गत शालेय स्तरावरील क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण देता येईल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

दोन अभ्यासक्रम होणार सुरू

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठांतर्गत पहिल्या टप्प्यात दोन अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात येणार आहे. बी.बी.ए (स्पोर्ट मॅनेजमेंट) आणि बी.एससी (स्पोर्ट सायन्स) या दोन अभ्यासक्रमांसाठी साधारणपणे येत्या ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. या अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी ६० एवढी विद्यार्थी संख्या असेल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

यावेळी क खासदार संजय राऊत, आमदार रोहीत पवार, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा आणि युवक कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, वास्तू शास्त्रज्ञ शशी प्रभू, सिम्बायोसिसच्या प्रमुख संचालक डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होते.


 

- Advertisement -