घरमहाराष्ट्रवरळी डेअरीच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल आणि मत्स्यालय उभारणार

वरळी डेअरीच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल आणि मत्स्यालय उभारणार

Subscribe

या प्रस्तावाला पालिकेतील पहारेकरी भाजपकडून यया प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना विषयांकित जमिनीवर 'आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल आणि मत्स्यालय' उभारण्यात येईल, असे घोषित केले होते.

मुंबई -: वरळी डेअरीच्या जागेतील काही भागाचा वापर करून तेथे ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल आणि मत्स्यालय’ उभारण्यात येणार आहे. मात्र तेथील प्रशासकीय इमारत ही दुग्ध विकास विभागाकडेच ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 उक्त अधिनियमाचे कलम 37 ( क क ) अन्वये बृहन्मुंबई विकास योजना 2034 मध्ये वरळी दुग्धशाळा, वरळी डिव्हिजन, मुंबई या जमिनी संबंधित प्रस्तावित फेरबदलाबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

या प्रस्तावाला पालिकेतील पहारेकरी भाजपकडून यया प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना विषयांकित जमिनीवर ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल आणि मत्स्यालय’ उभारण्यात येईल, असे घोषित केले होते. त्यानुसार वरळी डेअरीच्या काही जागेत पर्यटन संकुल होणार असून उर्वरित क्षेत्रावर विद्यमान शासकीय कार्यालय राहणार आहे.

- Advertisement -

मुंबईच्या विकास आराखड्यात वरळी डेअरीच्या आरक्षित जागेत काही फेरफार करावा लागणार आहे, त्यासाठी हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणीही घेण्यात आली होती. जागेच्या फेरफारीसंदर्भात आणि फेरफारीच्या अनुषंगाने राज्य शासनाशी पत्रव्यवहार करण्याचे अधिकार देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सुधार समितीत प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -