Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुणे महिला दिनी पुण्यात अर्ध्या दिवसाची सुट्टी; मुंबईत जलतरण तलाव शुल्कात सवलत

महिला दिनी पुण्यात अर्ध्या दिवसाची सुट्टी; मुंबईत जलतरण तलाव शुल्कात सवलत

Subscribe

पुणेः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे महापालिकेने महिला कर्मचाऱ्यांना बुधवारी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहिर केली आहे. तेजस्विनी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. तसेच मुंबई महापालिकेने जलतरण तलाव शुल्कात महिलांना २५ टक्के सवलत दिली आहे. दोन्ही पालिकांनी महिलांना अनोखी भेट दिली आहे.

८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कर्तृत्तवान महिलांचा सत्कार केला जातो. या दिनाचे औचित्य साधत पुणे पालिकेने महिला कर्माचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहिर केली आहे. वर्ग १ ते ३ अंतर्गत येणाऱ्या महिला कर्मचारी दुपारी ३ नंतर घरी जाऊ शकतात. तर वर्ग ४ मधील महिला कर्मचारी शहर स्वच्छतेसाठी पहाटेपासून कर्तव्यावर असतात. त्या सकाळी साडेदहानंतर घरी जाऊ शकतात, असे पुणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. तसेच पीएमपीकडून तेजस्विनी बसमधून मोफत प्रवासाची सवलत सुविधा महिलांना देण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या तरण तलाव शुल्कात महिलांसाठी २५ टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. यामुळे सध्या असणारे मोठ्या तरण तलावांचे वार्षिक सभासदत्व शुल्क हे १० हजार १०० रुपयांच्या ऐवजी महिलांसाठी ७ हजार ७०० रुपये इतके होईल. तर छोट्या तरण तलावांचे वार्षिक सभासदत्व शुल्क हे ८ हजार रुपयांच्या ऐवजी ६ हजार ८० इतके होईल. याच पद्धतीने त्रैमासिक व मासिक शुल्कात देखील २५ टक्क्यांची सवलत योजना लागू करण्यात आली आहे.
या योजनेचे आणखी एक ठळक वैशिष्ट म्हणजे आधीपासून सभासद असणा-या महिलांनादेखील ही सवलत योजना लागू करण्यात आली आहे.इच्छुक महिलांनी तसा अर्ज जलतरण तलाव व्यवस्थापकांकडे दिल्यास त्यांनी पूर्वी भरलेल्या शुल्काचे व उपयोगात आणलेल्या कालावधीचे परिगणन करुन त्यांच्या सभासदत्वाचा कालावधी वाढवून दिला जाणार आहे.
मुंबई महापालिकेचे ४ जलतरण तलाव सध्या कार्यरत आहेत. या चारही जलतरण तलावांमध्ये सकाळी ११ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ६ ही सत्रे केवळ महिलांसाठी राखीव आहेत. या महिलांसाठीच्या सत्रांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणा-या महिलांना सभासद शुल्कामध्ये तब्बल २५ टक्क्यांची सूट देण्यास पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -