घरमहाराष्ट्रनाहक बदनामी होत असल्याने नामदेव जाधवांची चौकशी करा, राजे लखोजीराव जाधवांच्या वंशजांची...

नाहक बदनामी होत असल्याने नामदेव जाधवांची चौकशी करा, राजे लखोजीराव जाधवांच्या वंशजांची मागणी

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात सध्या राजकीय आणि सामाजिक दोन्ही पातळ्यांवर गाजत आहे. अशातच मराठा आरक्षणाचे अभ्यासक नामदेव जाधव यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे मराठा समाजावर आज आरक्षणासाठी आंदोलनाची वेळ आल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने थेट पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यापाठोपाठ आता स्वराज्य संकल्पक महाराजा राजे लखोजीराव जाधव यांचे वंशजांनी त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – दादा गटातील आमदार नाराज, काहीजण BJP मध्ये जाण्याच्या प्रयत्नात; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

- Advertisement -

नामदेव जाधव यांनी अलीकडेच एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यासाठी शरद पवार हेच जबाबदार असल्याचा दावा केला होता. मंडल आयोगापेक्षा मोठा घोटाळा शरद पवारांनी 23 मार्च 1983 रोजी केला. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांनी लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी या जातींना एका ओळीचा आदेश काढून त्यांचा ओबीसीमध्ये समावेश केला. त्यासाठी त्यांनी आरक्षणाची मर्यादा 14 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर नेली, असे नामदेव जाधव यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाची 50 टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत आरक्षण शरद पवार यांनी नेले. यामुळे मराठ्यांच्या हक्काचे 16 टक्के आरक्षण डावलण्यात आले. मराठे हे 181 क्रमांकावर होते, त्यांच्या नावावर फुली मारून शरद पवारांनी 182 आणि 183 क्रमांकावरील तेली, माळी यांचा ओबीसी आरक्षणात समावेश केला. हे मराठ्यांच्या पाठीत खंजिर खुपसण्याचे काम शरद पवारांनी केले. चार वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते, मात्र त्यांनी कधीही मराठ्यांचे भले केले नाही, असा आरोपही त्यांनी केला होता. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते विकास लवांदे यांनी पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा – खोट्या प्रतिज्ञापत्रावरील टीकेला अजित पवार गटाचे शरद पवार गटाला प्रत्युत्तर, म्हणाले…

तर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी, स्वराज्य संकल्पक महाराजा राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज प्रा. राजे गोपाल भगवानराव जाधव यांचे पत्र शेअर केले आहे. नामदेव जाधव नावाची व्यक्ती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज म्हणवून घेत आहे, मात्र त्यांचा राजे लखोजीराव जाधव आणि जिजाऊ माँ साहेब यांच्या घराण्याशी कोणताही संबंध नसून ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी शरद पवार यांच्यावर टीका करत आहे. याबाबत चौकशी करून त्यांची तोतयेगिरी उघडकीस आणण्याची मागणी प्रा. राजे गोपाल भगवानराव जाधव यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -